Dhule Crime News: प्रेमसंबंधातून बदनामीमुळे युवकाची आत्महत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात

Crime News
Crime NewsSakal

धुळे : दह्याणे (ता. धुळे) येथे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याने युवकाची बदनामी केली. त्याच्यासह आईला दमदाटीही केली. त्याला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.

ही घटना रविवारी (ता. १९) घडली. समाधान विनायक मोरे (वय २१, रा. दह्याणे) असे त्या युवकाचे नाव आहे. युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीसह चौघांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Crime News
Dhule Crime News: LCB पथकावर जुगारींचा हल्ला; 5 पोलिस जखमी

मृत समाधान मोरे याचे चौगाव (ता. धुळे) येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध होते. त्यामुळे दोघे पळून गेले होते. याबाबत गुन्हाही दाखल झाला होता. नंतर बाळू विश्वनाथ सोनवणे व बाणूबाई बाळू सोनवणे यांनी समाधान याच्या घरी जात त्यांच्या आईसह आणि तुला मुलगा समाधान याला सोडणार नाही, तुम्हाला कायमची अद्दल घडवू, अशी दमदाटी केली.

नंतर १२ मार्चला समाधानसह बालिकेने विषारी पदार्थ सेवन केले. त्यामुळे दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा समाधान याने मी या गावात पाय ठेवणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

तथापि, बाळू सोनवणे, बाणूबाई सोनवणे, विधिसंघर्षित बालिका आणि गणेश भटू मोरे (सर्व रा. चौगाव) या चौघांनी गावात केलेल्या बदनामी व अपमानामुळे तसेच त्यांनी दिलेल्या अपप्रेरणामुळे समाधान याने रविवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास दह्याणे शिवारातील मुकटी नदीकाठच्या निर्जन ठिकाणी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले.

Crime News
Dhule News: आयुक्तांकडे तक्रार करूनही प्रश्‍न सुटत नाही; मंत्रालयातील चर्चेत आमदारांची तक्रार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com