PHOTO : काय मनात आले 'त्याच्या'? सप्तश्रृंगीच्या उंच शीतकड्यावरुन उडी घेतली..पण..  

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावाजवळ असलेल्या शीतकड्यावरुन प्रशांत जयवंतराव मोरे ( वय ३१) रा. औरंगाबाद यांनी ४ ते ५ दिवसांपूर्वी दुचाकी क्रमांक एमएच २० सीएम ५०८१ सह उडी घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी  शीतकड्याजवळ दुर्गंधी येत असल्याचे काही स्थानिक व भाविकांना जाणवले.

नाशिक : सप्तशृंगी गडावरील शितकड्यावरुन औरंगाबाद येथील युवकाने दुचाकीसह दरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेत युवकाच्या मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत मिळून आला असून दुचाकीचाही चेंदामेंदा झाला आहे.

बाईकवरुनच उडी घेतली त्याने...

सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावाजवळ असलेल्या शीतकड्यावरुन प्रशांत जयवंतराव मोरे ( वय ३१) रा. औरंगाबाद यांनी ४ ते ५ दिवसांपूर्वी दुचाकी क्रमांक एमएच २० सीएम ५०८१ सह उडी घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी  शीतकड्याजवळ दुर्गंधी येत असल्याचे काही स्थानिक व भाविकांना जाणवले. त्यांनतर शीतकडा खाली दरीत काहींनी डोकावले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहीती दिली मात्र अंधार पडल्याने शनिवारी सकाळी कळवण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होते.

Image may contain: 1 person, outdoor

काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी प्रशांत बेपत्ता असल्याची तक्रार

मृतदेह स्थानिकांच्या मदतीने दरीतून बाहेर काढला. यावेळी मृतदेहाचू तपासणी करतांना आधारकार्ड व भ्रमणध्वनी मिळून आला. तसेच घटनास्थळी दुचाकीची नंबर प्लेटही मिळून आली. याबाबत पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधून आधारकार्ड वरील व्यक्तीचे नाव व पत्ता बाबतची माहिती देवून चौकशी केली असता पोलिसांत काही दिवसांपूर्वी प्रशांत मोरे यांच्या कुटुंबीयांनी प्रशांत बेपत्ता असल्याची तक्रार केल्याचे आढळले आहे.  मृतदेहाच्या अवस्थेवरुन चार ते पाच दिवसांपूर्वीच तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. सदर तरुणाचे मामा हे पाळे, ता. कळवण येथील असल्याची माहीती असून याबाबत पोलिस अधिक चौकशी करीत आहे.

Image may contain: sky, outdoor and nature

सप्तशृंगी गड  :  शीतकडा येथे लावण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी कठड्याचे गायब झालेले पाईप

सुसाईट पॉईंट म्हणून कुप्रसिध्द

दरम्यान शीतकडा हे ठिकाणास भाविकांच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व तसेच पर्यटकांच्या दृष्टीने गडावरील एक गड व परीसरातील निसर्गसौदर्य टिपण्याचे एक प्रमुख ठिकाण असले तरी येथे वर्षभरात एक - दोन आत्महत्येच्या किंवा घातपाताच्या घटना घडत असल्याने हे ठिकाण सुसाईट पॉईंट म्हणून कुप्रसिध्द होत चालले आहे. याबाबत सप्तशृंगी गड निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत व वनविभाग या संस्थांनी पुढाकार घेवून शीतकडा परीसरात विद्युत दिवे बसवून कायमस्वरुपी सीसीटीव्ही यंत्रणा व वॉचमनची नेमणूक करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

हेही वाचा > डेंगी, मलेरिया फैलावावर नगरसेवकांचे मौन 

संरक्षक जाळी बसविण्याची मागणी

शितकडा परीसर वनविभागाच्या हद्दीत असून या ठिकाणी संरक्षक घात अपघात होवु नये बसवलेले  संरक्षक पाईप निघून गेलेले आहे. तसेच या भागात संरक्षक जाळीबसविण्याची मागणी वनविभागाकडे केलेली असून त्याबाबत ग्रामपंचायती मार्फत पाठपुरावा सुरु आहे. - राजेश गवळी, उपसरपंच सप्तशृंगी गड 

वाचा सविस्तर > राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा त्या कार्याध्यक्षाची पित्यासह हत्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide by jumping in a valley with a bike Nashik Marathi News