धुळ्यात पोहताना तरुणाचा मृत्यू

Vyankatesh-Satbhai
Vyankatesh-Satbhai

धुळे - येथील देवपूरमधील जिल्हा क्रीडा संकुलातील तरणतलावात १९ वर्षीय तरुणाचा पोहताना मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य कारणामुळे त्याचा मृत्यू झाला ते समजू शकले नाही. विच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल.

दरम्यान, चार वर्षांपूर्वी माजी महापौर मोहन नवले यांच्या नातवाचाही याच तरणतलावात बुडून मृत्यू झाला होता. आज मृत्यू झालेल्या तरुणाचे व्यंकटेश नितीन सातभाई (वय १९) असे नाव आहे. शहरातील जुने धुळ्यातील सातभाईवाड्यात त्याचे वास्तव्य होते. काही दिवसांपासून तो क्रीडा संकुलात पोहण्यासाठी येत होता. आज सकाळी तो अन्य तरुणांसमवेत पोहत होता. त्याच वेळी पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. घटना लक्षात येताच तेथे उपस्थित प्रशिक्षकांनी तलावात उडी घेत त्याला बाहेर काढून तातडीने शहरातील देवपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. सर्वोपचार रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह सायंकाळी कुटुंबीय, नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. व्यंकटेशच्या मृत्यूने सातभाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.

कॉलेज प्रवेशापूर्वीच मृत्यू
व्यंकटेश येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातून नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. यानंतर वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणास प्रवेश घेण्याचे त्याचे नियोजन होते. तत्पूर्वीच व्यंकटेशचा अपघाती मृत्यू झाला.

व्यंकटेशचे वयाच्या मानाने वजन अधिक असल्याने पोहण्याचा क्‍लास लावल्याचेही सांगण्यात आले. त्याचे वडील नितीन सातभाई जळगाव जनता बॅंकेत नोकरीला आहेत. पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक पिंपळे तपास करीत आहेत. व्यंकटेशचा मृत्यू पोहताना हृदयविकाराचा झटका आल्याने झाला की अन्य काही कारण आहे, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com