कृष्णापुरीतील बेपत्ता तरूणाचा घातपात?

दीपक कच्छवा
मंगळवार, 3 जुलै 2018

कृष्णापुरी तांड्यात भीती
कृष्णापुरी तांड्यावरील रविंद्र चव्हाण ह्या बेपत्ता झाल्याच्या    घटनेनंतर तांड्यावर भिती पसरली आहे.रविंद्रच्या बाबतीत सध्या तरी कोणीही काही बोलायला तयार नाहीत.पोलिसांना काही सांगितले तर आपण गोत्यात येवु आशी भीती सर्वांना वाटते. बंजारा समाजात पहिलेच शिक्षणाचा अभाव असुन समाजात अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे बेपत्ता रविंद्रच्या बाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जातो असे घरी सांगुन गेलेल्या कृष्णापुरी तांडा (ता.चाळीसगाव) येथील तरूण घरी परतलाच नाही.त्यामुळे त्याचा घातपात झाला की काय ? असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने मेहुणबारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेपत्ता तरूणाच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान या तरूणाचा लवकरात लवकर शोध घ्यावा,  आशी आर्त मागणी त्याच्या कुटंबियांनी केली आहे.

कृष्णापुरी तांडा येथील रविंद्र रामसिंग चव्हाण ( वय 22) हा तरूण घरी त्याच्या वडीलांना 'मी एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन येतो' असे सांगून सांगुन 11 जुनच्या रात्री साडेआठला निघाला मात्र, घरी परतलाच नाही.त्याच्या घरच्यांनी त्याची दोन दिवस  वाट पाहीली.सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेही मिळुन येत नसल्याने वडील रामसिंग चव्हाण यांनी 13 जुनला मुलगा हरविल्याची नोंद केली.

तपासाची चक्रे फिरवली
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. तपास अधिकारी एस.के.कुभांर व कमलेश राजपुत यांनी तपास सुरू केल्याने या मुलाचा घातपात झाल्याचा पोलिसांना प्रथमदर्शी संशय येत आहे.त्यांनी कृष्णापुरी तांडा लगतच्या धरण परिसरातील विहीरीची देखील पहाणी केली. मात्र अद्यापही रविंद्र मिळुन आलेला नाही.बेपत्ता झालेला रविंद्रचे शिक्षण चौदावीपर्यंत झाले आहे.बेपत्ता होण्यामागे  काही तरी वेगळे कारण समोर येण्याची शक्यता दिसत आहे.

कृष्णापुरी तांड्यात भीती
कृष्णापुरी तांड्यावरील रविंद्र चव्हाण ह्या बेपत्ता झाल्याच्या    घटनेनंतर तांड्यावर भिती पसरली आहे.रविंद्रच्या बाबतीत सध्या तरी कोणीही काही बोलायला तयार नाहीत.पोलिसांना काही सांगितले तर आपण गोत्यात येवु आशी भीती सर्वांना वाटते. बंजारा समाजात पहिलेच शिक्षणाचा अभाव असुन समाजात अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे बेपत्ता रविंद्रच्या बाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

बेपत्ता असलेल्या तरूणाच्या सर्व मित्रांची  कसून चौकशी सुरू आहे.त्या चौकशी नुसारच आमचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यात येईल.
- दिलीप शिरसाठ, साहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे

Web Title: youth in Krushnapuri