प्रेमीयुगलांचे वादग्रस्त केंद्र "खानदेश सेंट्रल' 

प्रेमीयुगलांचे वादग्रस्त केंद्र "खानदेश सेंट्रल' 

जळगाव - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खानदेश सेंट्रल या विस्तीर्ण अशा मॉल परिसरासह मुख्य इमारत अपघाती घटनांसह आता "प्रेमीयुगलां'चे वादग्रस्त केंद्र म्हणूनही समोर येत आहे. दिवसाला पाच-सात हजार नागरिकांचे येणे-जाणे असलेल्या या परिसरात प्रेमीयुगलांचा वावर, तरुणींच्या छेडखानीचे प्रकार सर्रास घडताना दिसतात. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सुरक्षेसह अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. 

शहरातील बंद पडलेल्या खानदेश मिलच्या जागेवर निर्माण झालेले "खानदेश सेंट्रल' हे मॉल सुरवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. येथील चित्रपटगृहातील वाद, कधी भिन्नधर्मीय जोडपे आढळून आल्यावरून झालेले हल्ले तर कधी सुरक्षेसाठी नियुक्त तरुणांनीच वैद्यकीय महाविद्यालयाच्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण करून ओढवलेला वाद.. हे प्रकार नित्याचेच. याच खानदेश सेंट्रलमधून जाणाऱ्या खासगी रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दरडावल्याचे प्रकरण घडले. 

सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह 
खानदेश सेंट्रलच्या गच्चीवरून जाहिरातीचे बॅनर लावताना खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आज एका प्रेमी तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणेबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. हा तरुण ज्या खिडकीतून पडदीवर पोचला, त्या खिडक्‍यांना लोखंडी ग्रीलची व्यवस्था नाही. थेट कुणीही बाहेर उडी घेऊ शकतो.. सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही प्रेमीयुगलांचे चाळे सामान्य महिला गृहिणींना ओशाळतील अशा अवस्थेत पार्किंगमध्ये सुरू असलेले प्रकार तिसऱ्या मजल्याच्या कान्या- कोपऱ्यातही सर्रास चालतात. आढळून येतात. त्यांना हटकणारे कोणी नाही, येथे नियुक्त सुरक्षारक्षकांना निदर्शनास आणून दिल्यास ते वाद घालतात. वेळप्रसंगी अंगावर येण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, अशी स्थिती आहे. 

सुरक्षेत कमतरता नाही 
परिसरात पुरेसे सुरक्षा रक्षक आणि जवळपास शंभर सीसीटीव्ही कॅमेरा असलेली यंत्रणा आहे. हा तरुण तिसऱ्या मजल्यावरील फूड कोर्टमध्ये बसला असताना अचानक खिडकीतून पलीकडे उतरला. स्टाफने त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने आम्हीच पोलिसांना फोन करून बोलावून घेतल्याचे सुरक्षा व्यवस्थापक अंकुश सूद यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com