काँग्रेसच्या युवा जागर यात्रेचा इगतपुरीतुन शुभारंभ

igatpuri
igatpuri

इगतपुरी : नाशिक जिल्हा व शहर  काँग्रेसच्या वतीने आज युवक काँग्रेसच्या युवा जागर यात्रेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आला. घाटनदेवी मंदिरात नारळ वाढवून संपूर्ण जिल्ह्याभरात संपर्क अभियानाच्या माध्यमातून झंझावात निर्माण करण्याचा संकल्प देखील यावेळी उपस्थितांनी केला.

नाशिक जिल्ह्यात काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी युवक काँग्रेस व एन. एस. यु. आय.च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी चंग बांधला असून यासाठी कोणत्याही प्रकारची गटबाजी न करता उपाध्यक्षा गावित, शहराध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक लोकसभा अध्यक्ष राहुल दिवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस स्वप्निल पाटील, एन. एस. यु. आय. प्रदेश सरचिटणीस नितीन काकड, शहराध्यक्ष सचिन भुजबळ, इगतपुरी विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ जल्लोषात करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.

यावेळी नयना गावित यांनी बोलताना सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे व बैठका घेतल्या जातील व समारोप जिल्ह्याचा संयुक्तपणे मेळावा घेऊन करण्यात येईल, तर जिल्हाभरात राहुल गांधींचे धोरणात्मक विचार पोहोचवून नवीन फळी तयार करण्याचा मानस असल्याचे इगतपुरी विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी सांगितले. जिल्हा व शहर काँग्रेसला असे प्रयोग नविन नाही मात्र तरुणांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच काँग्रेसला अच्छे दिन येतील असा विश्वास सामान्य कार्यकर्ता व्यक्त करत आहे त्यात जिल्हाभर कार्यकर्त्यांचं जाळं असलेले  आमदार जयप्रकाश छाजेड व काँग्रेसचा ग्रामीण भागातील आश्वासक चेहरा आमदार निर्मला गावित यांचं मनोमिलन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचं यावेळी दिसुन आले. 

या कार्यक्रमास माजी उपसभापती अर्जुन जाधव, तात्यापाटील भागडे, मच्छीन्द्र दोंदे, विजय खातळे, विजय कडू, युवराज कुंदे, संतोष भागडे, संदिप भागडे, गुरुनाथ भागडे, किरण रायकर, योगेश सुरुडे, भूषण डामसे, रमेश देवगिरे, कैलास घारे, अर्जुन जोशी, निलेश भोर मुद्क्सर शेख, मोहन भागडे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

घाटनदेवी मातेचा आशिर्वाद घेऊन आम्ही सर्व तरुण कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बैठका व मेळावे घेणार आहोत व तळागाळातील काँग्रेसचा कार्यकर्ता जागा करून येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावा घेऊन काँग्रेसला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी झटणार आहोत यात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही किंवा कोणालाही दुखवण्याचा हेतू नसुन फक्त पक्ष वाढवणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे.
- नयना गावित , उपाध्यक्षा, जिल्हा परिषद नाशिक

देशात व राज्यात सरकारला आलेले अपयश, नको असलेले समृध्दी, बुलेटट्रेन सारखे प्रकल्प यामुळे सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. मात्र याचा फायदा उचलावा या हेतूने आमदार निर्मला गावितांचा करिष्मा व आमदार जयप्रकाश छाजेड यांचा दीर्घ अनुभव यांची सांगड घालत जिल्ह्यात युवकांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. त्यात नक्कीच यश मिळेल.
- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष-इगतपुरी/त्र्यंबकेश्वर विधानसभा युवक काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com