मुख्यमंत्री होण्यासाठी यात्रा करीत नाही : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray
Aditya Thackeray

मालेगाव : शिवसेनेकडून आगामी विधानसभेनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात असणार हे लपुन राहिलेले नाही. त्यासाठी त्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरु झाली आहे. मात्र मालेगावला आल्यावर ते म्हणाले, "मुख्यमंत्री, मंत्री किंवा आमदार होण्यासाठी दौरा करीत नाही. त्याचा निर्णय तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी घेतील.''

हा निर्णय काय असेल हे सामान्य नागरीकांनाही माहिती आहे. मात्र आदित्य ठाकरे वेगळी अन्‌ राजकारणात मुरलेल्या नेत्याची भाषा बोलू लागल्याने शिवसेना नेत्यांचे चेहरेही आदित्य ठाकरेंचे बोलणे ऐकुण आचंबीत झालेले दिसले. 

ठाकरे यांची यात्रा शुक्रवारी मालेगावला पोहोचली. यावेळी त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी यात्रा मुख्यमंत्री, मंत्री पदासाठी किंवा आमदारांसाठी नाही. त्याचा निर्णय पक्षप्रमुख योग्य वेळी घेतील. ही यात्रा लोकसभा निवडणुकीत जे शिवसेना व युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी, ज्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज ऐकण्यासाठी व सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेतांनाच सर्वांना समान न्याय देण्यासाठी काढली. यातून शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आदींना बळ देऊन नव महाराष्ट्र घडवायचा असून सुरु असलेली कामे अधिक वेगाने करावयाची आहेत असे सांगीतले. 

यात्रेतून पहिल्या टप्प्यात ठाकरे यांची आज येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा झाली. ठाकरे म्हणाले, की शहरात येण्याची ही दुसरी-तिसरी वेळ आहे. मात्र येथील रस्ता, घरे, भिंती मला दिसल्याच नाहीत. कारण जिकडे तिकडे शिवसेनेचे कार्यकर्ते व शिवसेनेवर प्रेम करणारे नागरीकच दिसत होते. हेच आशिर्वाद घ्यायला मी महाराष्ट्रात फिरतोय. या यात्रेच्या निमित्ताने राज्य भगवामय झाले.

आमच्या मागे खंबीरपणे राहणाऱ्यांसाठी येथे आलो. आम्ही फक्त निवडणुकीपुरते काम करत नाही. शिवसेनेची व कार्यकर्त्यांची सेवा कुठल्या ना कुठल्या स्वरुपात चोवीस तास सुरू असते ती कुठल्याही पदासाठी नाही. या सेवेतून शिवसेनेचा झेंडा बुलंद होत आहे. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. 

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी एक बोधकथाही सांगितली. ते म्हणाले, एका तरुणाला गुरुजी तू वीस वर्षानंतर राजा होणार आहे सांगतात. यानंतर त्याचे गुरु त्याला तू जंगलात फिरुन ये असे सांगतात. पहिल्या दिवशी त्याला जंगलातील झाडे, नदी, नाले, वाघ, सिंह प्राणी दिसतात. तो परत येतो. त्याचे वडील त्याला पुन्हा जंगलात जाण्यास सांगतात. दुसऱ्या दिवशी जंगलात जातो आणखी काही नवीन गोष्टी समजतात. पुन्हा तिसऱ्यांदा जंगलात जातो. तेव्हा त्याला आवाज न येणाऱ्या सापाचा, पहाटे पडणाऱ्या दवाचा, सुर्योदयाचा, हवेचा असे न ऐकू येणारे आवाज येतात. तेव्हाच त्याला जंगल पूर्ण समजते. याच पध्दतीने दबलेल्यांचा आवाज ऐकूण घेण्यासाठी व राज्य समजून घेण्यासाठी मी फिरतोय. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, महापालिका गटनेते निलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, तालुकाप्रमुख संजय दुसाने, उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्‍ला, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, युवा सेनेचे विनोद वाघ, अविष्कार भुसे, भरत देवरे, राजु अलीझाड, प्रमोद पाटील आदी व्यासपीठावर होते. 

यावेळी बाजार समितीचे संचालक संजय घोडके, फकिरा शेख, माजी पंचायत समिती सभापती शशिकांत निकम, केशव पवार, मनोहर बच्छाव, राजेश गंगावणे, सुरेश शेलार, राजेंद्र अहिरे, सारंग बोरसे, देवेंद्र पवार, अनिता भुसे, संगिता चव्हाण, ज्योती भोसले, जिजाबाई बच्छाव, आशा आहिरे, कविता बच्छाव, हरीष पाटील, अभिजीत पगार, संजय ढिवरे, शरद कासार, किशोर दुकळे, यशवंत मानकर, विनोद जाधव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com