जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांची वाघळेला भेट

रोशन भामरे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सांगळे यांचे वाघळे गावात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी टाळमृदूंगाचा गजर करत तर शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाने त्यांचे स्वागत केले. उपसरपंच कुणाल पाटील यांच्या हस्ते सौ. सांगळे यांचा सत्कार करण्यात आला.

तळवाडे दिगर  : बागलाण तालुक्यातील वाघळे येथे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी भेट देऊन गावातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावात वृक्षारोपण केले. उपसरपंच कुणाल पाटील यांच्या विनंतीवरून सौ. सांगळे यांनी दिलेल्या भेटीमुळे गाव व परिसरातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळणार आहे.

सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सांगळे यांचे वाघळे गावात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी टाळमृदूंगाचा गजर करत तर शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाने त्यांचे स्वागत केले. उपसरपंच कुणाल पाटील यांच्या हस्ते सौ. सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. सौ. सांगळे व उपसरपंच कुणाल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  

यानंतर आयोजित मेळाव्यात गावातर्फे सौ. सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. जी. वाघळेकर होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या पाल्यांना चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेने विशेष योजना राबविल्या आहेत. 

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव आलेला आहे. लवकरच शाळेसाठी नव्या इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यात येईल. गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून चिखलमुक्त गाव तसेच ठक्कर बाप्पा योजनेतून गावातील विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासनही सौ. सांगळे यांनी दिले.

त्यावेळी उपसरपंच कुणाल पाटील, सरपंच सारिका पगार, सदस्य महेश वाघ, अनिल वाघ, लोटन माळी, अमोल असखेडकर, सुशिलाबाई भामरे, प्रमिला नंदन, केशरबाई सोनावणे अनिता गायकवाड कांती वाघ यांच्यासह वाघळे येथील नाशिक येथील रहिवासी तसेच गावातील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, गावकरी, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

shital sangale

“वाघळे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या जास्तीत जास्त योजना गावात राबवून वाघळे गावाला स्मार्ट विलेज बनविण्याचा ध्यास असून गावातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सोय करून देण्याचा निर्धार आहे.”  - कुणाल पाटील, युवा उपसरपंच वाघळे

Web Title: Zilha Parishad president shital sangale visit to talegaon digar