शाळा दुरुस्तीसाठी 153 प्रस्ताव प्राप्त 

school ripering zilha parishad dhule
school ripering zilha parishad dhule

ऊर ः जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी एक कोटी 80 लाख रुपये रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांच्या दुरुस्तीबाबत आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे साक्री तालुक्‍यातील सर्वाधिक 53, धुळे तालुक्‍यात 49, शिरपूर 38 व शिंदखेडा तालुक्‍यातील 13 अशा 153 प्रस्ताव शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव चारही तालुक्‍यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविले. या प्रस्तावांत वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
दरम्यान, अतिदुरवस्था झालेल्या गावांतील शाळांच्या दुरुस्तींना प्रथमतः प्राधान्य असेल. यासाठी विविध गावांतील सरपंच मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती.सी., प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांची भेट घेऊन आमच्या शाळेच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या, अशी व्यथाही मांडत आहेत. बांधकाम विभागातर्फे जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे शाळांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये निधीची मागणी केली होती. पैकी प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी एक कोटी 80 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रस्तावांच्या तुलनेत निधी कमी पडण्याची शक्‍यता आहे. गंभीर दुरवस्था झालेल्या शाळांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल. उर्वरित शाळांचा दुरुस्तीसाठी दुसऱ्या टप्प्यात समावेश होईल. यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात बहुतांश शाळांना गळती लागली आहे. 

तालुकानिहाय प्रस्ताव दिलेल्या शाळा 
शिंदखेडा ः जुने सुकवद, इंदिरानगर, शिंदखेडा शाळा क्रमांक 6, जातोडा शाळा क्रमांक 1 व 2, डांगुर्णे, सोंडले, जखाणे, अमराळे, आरावे, वरसूस, परसामळ, चिरणे. 

धुळे तालुका ः नवलाणे, चिंचवार (उर्दू शाळा), कोठारे, ढंढाणे, गोंदूर, मोरशवेडी, हेंकळवाडी, इंदिरानगर, रानमळा, बाभूळवाडी, अवधान (कन्या शाळा), पिंप्री, सोनगीर (कन्या शाळा), कापडणे शाळा क्रमांक 2 व 3, धनूर, सरवड, वडणे, रामी, बुरझड, खोरदड तांडा, मोरदड, तरवाडे, चांदे, वेल्हाणे, तांडे कुंडाणे, बोधगाव, वणी, मुकटी (कन्या शाळा), चिंचखेडे, आमोडे, आमदड, फागणे (मुलांची शाळा), फागणे (कन्या शाळा), मोराणे प्र. ल., अकलाड, भराडीपाडा, चौगाव, गोताणे, उडाणे, वार, सांजोरी, न्याहळोद (मुलांची शाळा क्रमांक 1), जापी, रायवट, पिंपरखेड, आर्वी, धाडरी, मोघण शाळा क्रमांक 2. 

साक्री तालुका ः कासारे (मुलांची शाळा), पेरेजपूर, मोठी शेलबारी, पापडीपाडा, लहान शेलबारी, शेवडीपाडा (नवा प्लॉट), हट्टी खुर्द, सतमाने, दुसाणे (कन्या व मुलांची शाळा), इंदवे, नागझिरी, विहीरगाव, पंढरपूर, अष्टाणे, लोणश्वरी पिं., डाभरी, कढरे, धाडणे, शेणपूर, मैंदाणे, सातरपाडा, नवागाव (खां.), तांडेपाडा (मै.), काशिपूर, भिलवाड हट्टी, आयने, म्हसाळे (कर्मवीर सो.), उंभरे, रोहण, पिंपळनेर (उर्दू शाळा), रांजणीपाडा, बोपखेल, मावचीपाडा (का), खट्याळ, सावरीमाळ, मोगरपाडा, शिव, वर्दळी, जामनेपाडा, गरताड, कुहेर, सावरपाडा, धामणदर, चिंचपाडा (पान.) भाईंदर, जामनेपाडा, बहिरमपाडा, निरगुडीपाडा. 

शिरपूर तालुका ः बोरगाव, खर्दे, चांदसे, कुवे, जुने भामपूर, उखळवाडी, जळोद, भटाणे, तऱ्हाडी, जवखेडा, नवे लोंढरे, जुनी अंतुर्ली, अभानपूर, तऱ्हाड कसबे, जामझिरा, सटीपाणी आदी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com