जिल्हा परिषदेच्या 56 शाळांना "आयएसओ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

जळगाव - शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सुविधा उभारणीवरून जिल्हा परिषद शाळांना देखील आता आयएसओ मानांकन दिले जात आहे. यात जिल्ह्यातील 56 शाळांना आयएसओ समितीने दखल घेत त्यांना "आयएसओ' दर्जा दिला आहे. जि.प. शाळांना मानांकन मिळण्याचा जिल्ह्याला प्रथमच मान मिळाला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी 25 शाळा दत्तक घेत त्यांच्याकडे विशेष लक्ष देवून प्रोत्साहन देवून सुविधा देण्यावर भर दिला होता. याकरिता क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन जागृती करणे, तसेच स्थानिक स्तरावरील शालेय शिक्षण समिती, शिक्षण विभाग आणि गावकऱ्यांच्या सहभागातून शाळेत विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक भौतिक सुविधा उभारण्याचे काम केले होते. शिक्षण विभागाकडून तालुका, गावस्तरावर विद्यार्थी, पालकांच्या कार्यशाळा घेत दर्जेदार शिक्षण व सुविधांबाबत सतत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण विभागाच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

अमळनेर तालुक्‍यात सर्वाधिक शाळा
जिल्हा परिषदेच्या एकूण 1 हजार 847 शाळा आहेत. यापैकी 56 शाळांना आयएसओ मानांकन मिळण्याचा बहुमान मिळाला असून, यातील अमळनेर तालुक्‍यात सर्वाधिक 9 शाळांचा समावेश आहे.

Web Title: zp 56 schools ISO