फडफड इंग्रजी बोलणारे विद्यार्थी पाहून पदाधिकारी झाले अवाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

येवला - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांकडे अजूनही प्रगत म्हणून पाहतांना चारदा विचार केला जातो. त्यात एखाद्या वस्तीवरची शाळा असेल तर विचारायलाच नको मात्र हा गैरसमज दूर केला आहे तो आंबूमाळी मळा (नगरसूल) येथील प्राथमिक शाळेने. या शाळेतील पहिली दुसरीचे फडफड इंग्रजी बोलणारे विद्यार्थी आणि तिसरी चौथीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून शाळेला भेट देणारे पदाधिकारीही आवाक झाले.

३८ विद्यार्थी असलेल्या या शाळेला पंचायत समिती सदस्य मंगेश जाधव व प्रवीण गायकवाड यांनी गुरुवारी अचानकपणे भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे वाचन लेखन तसेच संभाषण याची चाचपणी केली. या सगळ्या कौशल्यात पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांचे या पदाधिकाऱ्यांनी इंग्रजी वाचन व संभाषण बघितले आणि त्यांची गुणवत्ता पाहून हे पदाधिकारी काहीवेळ अवाकच झाले.

इंग्रजी माध्यमाची मुले परिपक्व व अष्टपैलू घडत नाहीत, त्यामुळे ते मागे पडतात. मात्र मराठी माध्यमात शिकलेली जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गुणवत्ताप्रधान शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे परिपक्व व विकासीत होत असल्याची अनेक उदाहरणे असल्याचे गायकवाड या वेळी म्हणाले. विद्यार्थ्यांची प्रगती बघून अॅड. जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक केले. 

पहिली व दुसरीच्या वर्गांसाठी सेमी माध्यम सुरू झाले असून, या वर्गांचे शिक्षक रामकृष्ण घुगे यांच्या मेहनतीमुळे हे विद्यार्थी आतापासूनच इंग्रजीसह मातृभाषेत पारंगत असल्याचे गौरवोद्गार केंद्रप्रमुख बाबाजी बर्डे यांनी काढले. सहकारी शिक्षक अरुण सूर्यवंशी यांचेही कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर बोरसे, माजी सरपंच राजेंद्र पैठणकर, भाऊसाहेब बोरसे, जगन पैठणकर, श्रीराम पैठणकर, दत्तू पैठणकर, लक्ष्मण पैठणकर, राजेंद्र कुडके, बबन कांडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: zp school students speaks fluent english