जळगाव जिल्ह्यात पुन्हा ‘व्हॉट्‌सॲप’ हजेरीची प्रणाली

Whatsapp
Whatsapp

जळगाव - शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा सोडणे, रजा न टाकताच दांडी मारणारे अनेक शिक्षक आहेत. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’ हजेरीची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. साधारण वर्षभर बंद पडलेली ही प्रणाली काही सुधारणा करून पुन्हा अमलात आणली जात आहे. शिक्षकांना दोन्ही वेळेस हजेरीचे अपडेट्‌स या प्रणालीद्वारे द्यावे लागणार आहेत. 

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. शिवाय शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून पावले उचलली जात असली, तरी शिक्षकांची अनुपस्थिती, शाळेत उशिरा येण्याचे प्रकार सुरूच आहेत. अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नसून, शहर किंवा तालुक्‍याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. यामुळे शाळेत वेळेवर न येणे, शाळेतून लवकर जाण्याचे प्रकार रोजचे असतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी व्हॉटस्‌ॲप हजेरी ही प्रणाली सुरू केली होती. यास शिक्षकांकडून विरोध झाला होता.

दीड वर्षानंतर पुन्हा चालना
ही प्रणाली सुरू करणारे तत्कालीन सीईओ पांडेय यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले दिवेगावकर यांच्या काळात ही प्रणाली बंद पडली होती. साधारण दीड वर्षे ही प्रणाली बंद राहिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी पुन्हा चालना देत प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीला उद्यापासून (ता.११) सुरवात करण्यात येत असून, यासाठीच्या सूचना केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com