..ते कारसेवा करताना दिसतील, योगींचा अखिलेश यांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath,Akhilesh Yadav

..ते कारसेवा करताना दिसतील, योगींचा अखिलेश यांना टोला

आंबेडकरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. रामभक्तांवर गोळीबार करायला लावणारे पुढील निवडणुकीपर्यंत कारसेवा करताना दिसतील, असा टोला त्यांनी लगावला.

योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर येथे प्रचारसभा घेतली. या सभेत योगींनी भाजपा सरकारच्या कामाचा पाढाच वाचून दाखवला. पाच वर्षात भाजपाने उत्तर प्रदेशचा चेहरामोहराच बदलला आहे. राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण झाले असून विकासकामं सुरू आहेत. तसेच सरकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा: मोठी बातमी : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींना फोन, म्हणाले...

२०१७ पूर्वी अकबरपूरवासियांना वीज नव्हती मिळत. आधी या भागात वीज यायची नाही. आता वीज पुरवठा खंडित होत नाही. आधी होळी, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित व्हायचा. सणासुदीपूर्वी दंगल व्हायची. पण आता चित्र बदललंय. २०१७ नंतर दंगेखोर घाबरू लागले आहेत, असंही योगींनी सांगितले.

या सभेत योगींनी सपाचे अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ५०० वर्षांपासूनचं आपलं स्वप्न आता पूर्ण होतंय. अयोध्येत रामंदिर होतंय. जी लोक रामभक्तांवर गोळीबार करायला लावत होते. आता तीच लोक हनुमानाची गदा घेऊन फिरतायंत. असंच सुरू राहिलं तर पुढील निवडणुकीपर्यंत रामभक्तांच्या रांगेत उभं राहून कारसेवा करतानाही दिसतील, असं योगी म्हणाले.

हेही वाचा: Manipur : AFSPA बाबत भाजपने स्पष्ट केली भूमिका; मुख्यमंत्री म्हणाले...

कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये विनामूल्य कोरोना चाचणी आणि लस हे भाजपामुळेच शक्य झाले. सपा, बसपाची सत्ता असती तर त्यांनी लस विकली असती. आम्ही गरिबांना मोफत राशन दिलं. २०१७ पूर्वी असं चित्र नव्हतं. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Web Title: Cm Yogi Adityanath Akhilesh Yadav Up Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top