संघाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न; मायावतींचा भाजपवर आरोप

समाजवादी पक्षाचे सरकार असताना उत्तर प्रदेशात गुंड-माफियांचे राज्य होते. समाजवादी पक्षाने नेहमीच विशिष्ट समुदायासाठी काम केले आहे. काँग्रेस पक्ष सुद्धा नौटंकी करतो.
Mayawati
MayawatiSakal
Summary

समाजवादी पक्षाचे सरकार असताना उत्तर प्रदेशात गुंड-माफियांचे राज्य होते. समाजवादी पक्षाने नेहमीच विशिष्ट समुदायासाठी काम केले आहे. काँग्रेस पक्ष सुद्धा नौटंकी करतो.

आग्रा - समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) सरकार (Government) असताना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गुंड-माफियांचे राज्य होते. समाजवादी पक्षाने नेहमीच विशिष्ट समुदायासाठी काम केले आहे. काँग्रेस पक्ष (Congress Party) सुद्धा नौटंकी करतो. सत्तेत असताना महिलांची (Women) आठवण आली नाही. आता मात्र तिकीट वाटपात चाळीस टक्के जागा राखीव ठेवण्याचे नाटक केले जात आहे. भाजपच्या राज्यात दलितांची स्थिती ढासळली आहे. भाजपकडून केवळ आरएसएसचा अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती (Mayawati) यांनी आज केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनिमित्त बसप उमेदवाराच्या प्रचारार्थ मायावतींची आज आग्रा येथे सभा आयोजित केली होती. कोठी मीना बाजार मैदानात मायावती यांना ऐकण्यासाठी शहरातीलच नाही तर परिसरातील जिल्ह्यातील समर्थकही मोठ्या संख्येने आले होते. सभेच्या ठिकाणी केवळ एक हजार जणांना प्रवेश देण्यात आला. तरीही गर्दी वाढत गेली. सभेत त्या म्हणाल्या, की चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली आहे. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींची त्यांनी हेळसांड केली. काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न सन्मान दिला नाही. दलितांना पदोन्नतीत आरक्षण देण्यास समाजवादी पक्षाने नेहमीच टाळाटाळ केली आहे. समाजवादी पक्षाने दलितांना कधीही जवळ केले नाही.

Mayawati
PM मोदींमुळे कोरोना काळातही प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आली - शाह

गुंड आणि माफियांना अखिलेश यांच्या सरकारने संरक्षण दिल्याचा आरोपही मायावती यांनी केला. भाजपचे लोक आरएसएसचा अजेंडा राबवत आहेत. त्यांनी राज्यात भेदभावाचे धोरण राबविले. उत्तर प्रदेशला सापत्नपणाची वागणूक दिली. उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना केंद्राच्या चुकीच्या धोरणाचे परिणाम भोगावे लागत असल्याचे टीकास्त्र मायावतींनी सोडले.

लगतच्या राज्यातूनही कार्यकर्ते दाखल

बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कोठी मीना बाजार येथे आग्रा विभागातील तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. सभेच्या ठिकाणी केवळ एक हजार लोकांनाच सोडण्यात आले. ग्वाल्हेर येथून आलेल्या बसप कार्यकर्त्याच्या मते, आपल्याला सभेच्या ठिकाणी जाता आले नाही तरी मायावती यांचा आवाज आणि संदेश ऐकला आहे. त्यामुळे आपला येण्याचा उद्देश सफल झाला. राजस्थानच्या धौलपूर येथील एका कार्यकर्त्याने, मायावतींनी दिलेला संदेश आपण राज्यातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचवू, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com