अमित शहांनी सत्य स्वीकारलं, हा त्यांचा मोठेपणा; असं का म्हणाल्या मायावती?

Mayawati AmitShah
Mayawati AmitShahesakal
Summary

बसपानं उत्तर प्रदेशवर आपली मजबूत पकड कायम ठेवलीय : अमित शहा

यूपी निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election) मतदान सुरू झालंय. यूपी निवडणुकीत विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरवात झालीय. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी आज (बुधवार) सकाळी बूथवर पोहोचलेल्या बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचं कौतुक केलंय. अमित शहा यांनी बसपाला मजबूत पक्ष असल्याचं म्हंटलं होतं. या प्रश्नावर मायावती म्हणाल्या, अमित शहांनी सत्य स्वीकारलं. हा त्यांचा मोठेपणा आहे. पक्षाला फक्त दलित आणि मुस्लिमांचीच नव्हे, तर सर्वच वर्गांची मतं मिळायला हवीत, असंही त्या म्हणाल्या.

लखनौमधील (Lucknow, UP) मॉल एव्हेन्यू येथील बूथवर मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मायावती म्हणाल्या, आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय. मतदारांनी हा लोकशाहीचा सण समजून मतदानासाठी बाहेर पडावं. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या अथक परिश्रमामुळं आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालाय, त्यामुळे त्याचा उपयोग झालाच पाहिजे. मी प्रत्येक मतदाराला आवाहन करतो की, लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांनी मतदान करायलाच हवं, असंही त्यांनी नमूद केलं. अमित शहांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बसपा सुप्रीमो म्हणाल्या, मला वाटतं की शहांनी सत्य स्वीकारलंय, हा त्यांचा खरंच मोठेपणा आहे. उत्तर प्रदेशात बसपाला एकट्या दलित आणि मुस्लिमांचीच (Muslim) मतं मिळत नाहीत, तर बहुजन समाजातील सर्वच घटकांची मत मिळत असतात. त्यामुळंच पक्ष विजयी होत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

Mayawati AmitShah
मनात विकृती असणाऱ्यांनी संभाजी महाराजांची बदनामी केलीय : उदयनराजे

बसपाबद्दल काय म्हणाले होते अमित शहा?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले होते, मायावतींनी त्यांची प्रासंगिकता गमावलेली नाहीय. त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात चांगली मतं मिळतील. बसपानं उत्तर प्रदेशवर आपली मजबूत पकड कायम ठेवलीय. मला खात्री आहे की, त्यांना जास्त मतं मिळतील. बसपाला किती जागा मिळतील, हे मला माहीत नाही; पण चांगली मतं मिळतील याची खात्री आहे. मायावतींसोबत जाट, मुस्लिम आणि दलित वर्गाची मोठी व्होट बॅंक आहे, असंही ते म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com