उत्तर प्रदेश : भाजपच्या विजयानंतर तरुणानं जाळली शैक्षणिक कागदपत्रं!

या तरुणानं आपली शैक्षणिक कागदपत्रं जाळत आता नोकरीची आशा संपल्याचं म्हटलं आहे.
ShilRatan_UP Youth
ShilRatan_UP Youth

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर एका तरुणानं आपली शैक्षणिक कागदपत्र जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता आपल्याला नोकरीची आशा नसल्यानं आपण हे केल्याचं संबंधीत तरुणानं म्हटलं आहे. (Uttar Pradesh after BJP victory youth burnt educational documents)

ShilRatan_UP Youth
दणदणीत पराभवाचं होणार मंथन; सोनिया गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेसची बैठक

मैनपुरी जिल्ह्यातील करहलचा रहिवासी असलेल्या शीलरतन नामक तरुणानं हायस्कूल आणि कॉलेजची मार्कशीट आणि प्रमाणपत्र शनिवारी जाळून टाकली. शीलरतननं व्हिडिओत म्हटलं की, योगी सरकारनं नोकर भरती केली नव्हती. आता माझं नोकरीची वयही उलटून जाणार आहे. आपल्याला आशा होती की, सन २०२२ मध्ये समाजवादी पार्टी सत्तेत येईल पण असं झालं नाही. शीलरतन या तरुणाचं करहल ब्लॉकसमोर कॉम्प्युटर खरेदी-विक्री आणि रिपेअरिंगचं दुकान चावलतो. त्याचबरोबर स्टेशनरी विक्रीचंही तो काम करतो.

ShilRatan_UP Youth
'गाफील राहू नका' अजित पवारांचा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना सल्ला

भाजपनं उत्तर प्रदेशात २५५ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या सहकारी पक्षानं १२ तर निषाद पार्टीनं ६ जागांवर विजय मिळवला. तर समाजवादी पार्टीच्या आघाडीला १२५ जागा मिळाल्या. यामध्ये आठ जागांवर राष्ट्रीय लोक दल तर सहा जागांवर सुभासपा या पक्षाला विजय मिळाला. तर सपाचा गड मानल्या जाणाऱ्या मैनपुरी जिल्ह्यात सपाला दोनच जागा मिळाल्या आहेत. अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com