‘यूपी’च्या शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी; काँग्रेसचे आश्‍वासन

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ‘उन्नती विधान जनघोषणा-२०२२’ या नावाने जाहीरनामा प्रियांका गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केला.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSakal
Summary

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ‘उन्नती विधान जनघोषणा-२०२२’ या नावाने जाहीरनामा प्रियांका गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केला.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आमचे सरकार (Government) सत्तेवर आले तर दहा दिवसांत शेतकऱ्यांचे (Farmer) कर्ज माफ (Debt forgiveness) केले जाईल. तांदूळ व गव्हाची प्रति क्विंटल अडीच हजार रुपये आणि उसाची ४०० रुपये प्रति क्विंटल दरात खरेदी करण्याचे आश्‍वासन काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधी - वद्रा यांनी दिले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ‘उन्नती विधान जनघोषणा-२०२२’ या नावाने जाहीरनामा प्रियांका गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केला. त्या म्हणाल्या, ‘‘ एक लाख लोकांशी संवाद साधून काँग्रेसने हा जाहीरनामा तयार केला आहे. यात सामान्य नागरिक, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ लोकांसह प्रत्येक क्षेत्रातील लोकांचा सहभाग आहे. हा खऱ्या अर्थाने जाहीरनामा आहे. यातून जनतेच्या आकांक्षा काय आहेत आणि काँग्रेस जनतेसाठी काय करणार आहे हे आम्ही सांगू इच्छित आहोत.’’ आम्हा जेवढे जाहीरनामे घोषित केले आहेत, त्यातील घोषणा या सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत. राज्यातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. राज्याचा विकास आम्ही कसा करणार आहोत, हे आमच्या जाहीरनाम्यातून सांगितले आहे, असेही त्या म्हणाल्या.

Priyanka Gandhi
ठरलं! CM योगींविरोधात 'हा' तगडा उमेदवार निवडणूक लढवणार

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्‍वासन देताना प्रियांका गांधी यांनी छत्तीसगडचे उदाहरण दिले. त्या राज्यात काँग्रेस सरकारने शपथ घेतल्यानंतर तीन तासांच्या अवधीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, असे त्या म्हणाल्या. रोजगार देण्याचे मोठे आश्‍वासनही पक्षाने दिले आहे. सत्तेवर आल्यानंतर २० लाख लोकांना काँग्रेस रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

‘उन्नती विधान जनघोषणे’त...

  • सत्तेवर आल्यानंतर दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार

  • तांदूळ व गहू प्रति क्विंटल अडीच हजार रुपये आणि उसाची ४०० रुपये प्रति क्विंटल दरात खरेदी

  • विजेचे बिल निम्म्यावर आणणार आणि कोरोना काळातील थकबाकी माफ करणार

  • कोरोनाकाळात आर्थिक संकट ओढवलेल्या कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत करणार

  • २० लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणार

  • पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि शिक्षण विभागासह सार्वजनिक क्षेत्रातील अन्य विभागांमधील १२ लाखांचा अनुशेष भरला जाईल

  • याशिवाय आणखी आठ लाख नोकऱ्या देणार

  • कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्यांना नोकरीत टप्प्याटप्प्याने कायम करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com