बापरे! नागपुरात कोरोनाने मोडले सगळे रेकॉर्ड.. एकाच दिवशी तब्बल १०३६ पॉझिटिव्ह.जाणून घ्या आजची आकडेवारी 

1036 corona positive todaty in nagpur
1036 corona positive todaty in nagpur

नागपूर:  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा अपयशी ठरली असून बाधितांच्या संख्येत हजारापर्यंत भर पडली आहे. आज कोरोनाबाधितांच्या संख्येने एकाच दिवसातील बाधितांचा उच्चांक गाठला. जिल्ह्यात १०३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्याचवेळी मेयो, मेडिकलमध्ये २७ बाधितांचे मृत्यू झाले असून यात शहरातील २२ जणांचा समावेश असून एक ग्रामीणमधील तर चार जिल्ह्याबाहेरचे आहेत. बाधित व बळींच्या वाढत्या आलेखाने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चाचणी करण्यासाठी तपासणी केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

लॉकडाउन उघडल्यानंतर मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबतीत सवलत देण्यात आली. परिणामी नागरिकांची संख्याही रस्त्यावर वाढली. त्यासोबतच आता कोरोनाबाधितांच्या संख्येचा उद्रेक झाला. दररोज बाधितांचे आकडे जुन्या आकड्यांचा विक्रम मागे टाकत आहे. यापूर्वी एकाच दिवशी कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या साडे आठशे होती. आज हा विक्रमही मागे पडला. 

शहरातील मेयो, मेडिकल, एम्स, पशुवैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेचे चाचणी सेवा केंद्र तसेच खाजगी लॅबमधून आलेल्या तपासणी अहवालातून १०३६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. यासह कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ७४५ वर पोहोचली. मेयो, मेडिकलमध्ये आज २७ बाधितांचा मृत्यू झाला. या मृत्यूसह कोरोनाबळींची संख्या ४४७ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ३१६ जणांचा तर नागपूर ग्रामीणमधील ७३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कोरोनाबळींची संख्या ५८ आहे. 

मेडिकलमध्ये मृत्यू

आज मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये जरीपटक्यातील ९० वर्षीय पुरुष, मा भवानीनगरातील ५२ वर्षीय पुरुष, रामेश्वरी, रामटेकेनगरातील ५३ वर्षीय पुरुष, वैशालीनगरातील ५० वर्षीय पुरुष, शिवाजीनगर माता मंदिर परिसरातील ४९ वर्षीय महिला, हंसापुरीतील ८७ वर्षीय पुरुष, बजेरिया लोधीपुऱ्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

मेयोतील मृत्यू 

मेयोत दत्तवाडी म्हाडा कॉलनीतील ५९ वर्षीय, बेलतरोडीतील ६२ वर्षीय पुरुष, सेंट्रल एव्हेन्यूवरील ७२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, रविनगरातील ६१ वर्षीय महिला, देवीनगर टेका नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, पुनापूर येथील २२ वर्षीय तरुणी, हिंगणा येथील ८५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित व मृत्यूच्या आलेखामुळे चाचणी करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आतापर्यंत एक लाख ११ हजार ६२५ पर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे महापालिकेने २१ चाचणी सेवा केंद्र सुरू केल्यानंतर चाचणी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

पाच हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

शहरात आज १२३ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ५६३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. परंतु दररोज वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे कोरोनामुक्तीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. काल कोरोनामुक्त झालेल्या दर ४७.११ होता. यात आज कोरोनामुक्त झालेल्यांचा दर ४४.२४ टक्क्यांपर्यंत घसरला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com