विद्यार्थ्यांनो खुषखबर! आयआयएममध्ये जागा होणार दुप्पट

indian-institute-of-management-iim-nagpur.jpg
indian-institute-of-management-iim-nagpur.jpg

नागपूर : देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालये आणि शाळा बंद असताना, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. नागपुरात गेल्या चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएमएन)ने चौथ्या वर्षीच आपल्या जागा दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी संस्थेकडून 240 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यात आयआयएम सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर 2015 साली नागपुरात विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या परिसरात आयआयएमची सुरुवात करण्यात आली. यावेळी 60 जागांचा समावेश होता. आयआयएम अहमदाबादचे पालकत्व असलेल्या संस्थेचे कॅम्पस नोव्हेंबरमध्ये मिहानमध्ये आपले विस्तारित जागेवर काही महिन्यात सुरू होणार आहे.

मौजा दहेगाव येथे 2 एकरांवर पसरलेल्या या नवीन विभागात पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहे. यात प्रशासकीय कॉम्प्लेक्‍स, शैक्षणिक इमारती (उत्तर व दक्षिण), "एक्‍झिक्‍युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम (ईईपी)' आणि 'आयआयएम-एन फाउंडेशन फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट' (आयएनएफईडी), बहुउद्देशीय हॉल, विद्यार्थ्यांचे वसतिगृह ब्लॉक, जेवणाचे हॉल आणि स्टेडियमचा समावेश आहे. याशिवाय केंद्र, आरोग्य केंद्र आणि अत्यावश्‍यक इमारती, प्राध्यापक आणि कर्मचारी निवासस्थान आणि सहाय्यक अभियांत्रिकी सेवांचाही यामध्ये समावेश आहे. यादरम्यानच संस्थेद्वारे सातत्याने त्यांच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्यावर भर दिला आहे.

गतवर्षीही 10 जागा वाढविण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी संस्थेद्वारे त्यात 110 जागांची वाढ करीत, त्या 240 म्हणजे जवळपास दुप्पट करण्यात आल्या आहेत. गेल्या चार वर्षात संस्थेने बरीच प्रगती केली असून विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये बड्या पॅकेजवर शंभर टक्के प्लेसमेंट मिळाले आहे. अगदी कोरोना काळात विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळाले हे विशेष.

सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?

वाढलेल्या जागा

वर्ष                    जागा

2015-16 -------- 60

2018-19 -------- 120

2019-20 --------- 130

2020-21 ---------- 240

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com