
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आणलेले सर्व प्राणी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वास्तव्यास होते. प्राणी हलविण्याचे काम सहा दिवस चालले. मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते,
नागपूर ः गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात वाघाला स्थानांतरित केल्यानंतर वाघिणीसह सात बिबटे आणि सहा अस्वलासह १५ वन्यप्राण्यांना हलविण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी महिन्यात या प्राणिसंग्रहालयाचा श्रीगणेशा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून या प्रकल्पाचा नियमित आढावा घेतला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आणलेले सर्व प्राणी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वास्तव्यास होते. प्राणी हलविण्याचे काम सहा दिवस चालले. मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते, डॉ. शिरीष उपाध्ये, विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी प्राण्यांच्या स्थानांतरणात महत्त्वाची भूमिका बजावली.
क्लिक करा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
राजकुमार या वाघाला सर्वप्रथम प्राणिसंग्रहालयात हलविले. त्यानंतर एका वाघिणीला स्थानांतरित करण्यात आले. राजकुमार वाघ हा बालाघाट परिसरातून महाराष्ट्रात आला होता. गावाच्या शेजारीच वास्तव्यात असल्याने त्याला जेरबंद करुन गोरेवाड्यात आणले होते.
रेस्क्यू सेंटरमधील हाऊसफुल्ल झालेले पिंजरे आत रिकामे झाले आहेत. दोन नर आणि पाच माद्यांसह सात बिबट आणि सहा अस्वलाना यशस्वीपणे स्थानांतरित करण्यात आले. ट्रान्झिटच्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी या प्राण्यांना हलविले.
सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी
गोरेवाडा प्रशासनाने सर्व पत्रव्यवहार पूर्ण करून ट्रान्झिट सेंटरच्या टीमला मदतीची मागणी केली. त्यानुसार येथील पिंजरे, रेस्क्यू करणारी गाडी, डॉक्टर आणि अनुभवी लोकांची मदत घेण्यात आली. एक एक करून सहा दिवसात सर्व प्राणी गोरेवाड्यात हलविण्यात आले. यानंतर हरीण व इतर प्राणी हलविण्यात येणार आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ