नागपुरात बाधितांचा आलेख पुन्हा खाली; जिल्ह्यात पाच बळी; नवे १५९ रुग्ण

राजेश प्रायकर 
Saturday, 7 November 2020

जिल्ह्यात शनिवारी पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ३०८ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे पुन्हा एकदा आशादायक चित्र निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.

नागपूर ः गेल्या दोन दिवसांत तीनशेवर गेलेला कोरोनाबाधितांचा आलेख आज पुन्हा खाली आली. आज जिल्ह्यात १५९ बाधितांची नोंद करण्यात आली.

जिल्ह्यात शनिवारी पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ३०८ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे पुन्हा एकदा आशादायक चित्र निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला. शनिवारी शहरातील विविध लॅबमध्ये ४ हजार २८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १५९ जण बाधित आढळून आले. यात ग्रामीण भागातील २१ तर शहरातील १३५ जणांचा समावेश आहे. 

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

तिघेजण जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख ४ हजार ६६८ पर्यंत पोहोचली. यात अर्थातच शहरातील सर्वाधिक बाधितांचा समावेश आहे. शहरातील बाधितांची संख्या ८२ हजार ७२४ पर्यंत पोहोचली. ग्रामीणमधील २१ हजार ३२६ जण बाधित आढळून आले. ग्रामीण भागात आज केवळ मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शहरातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. 

जिल्ह्याबाहेरील तिघांनी शहरात शेवटचा श्वास घेतला. कोरोनाबळींची एकूण संख्या ३ हजार ४६४ एवढी झाली. यात शहरातील २ हजार ४४८ तर ग्रामीण भागातील ५८० जणांचा समावेश आहे. कोरोनाने दगावलेले ४३६ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३ हजार ९९८ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील २ हजार २८९ घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

३०८ जण कोरोनामुक्त

घरी तसेच रुग्णालयांत उपचार घेणारे ३०८ जण आज कोरोनामुक्त झाले. यात शहरातील २०७ तर ग्रामीण भागातील १०१ जणांचा समावेश आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ९७ हजार ८०६ पर्यंत पोहोचली. शहरातील ७७ हजार ७१९ तर ग्रामीण भागातील २० हजार ८७ जणांनी कोरोनावर मात केली.

 संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 159 corona positive in nagpur district today