उपराजधानीत कोरोनाचा आकडा सतराशे पार! कारागृहात बाधितांचे शतक

coronavirus.jpg
coronavirus.jpg

नागपूर : शहरातील विविध लॅबमधून आज आलेल्या अहवालातून 26 जणांना कोरोनाचे निदान झाले. त्यामुळे उपराजधानील कोरोनाबाधितांची संख्या 1707 झाली. आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये कारागृहातील सात कैद्यांचा समावेश आहे. या सात कैद्यांसह कारागृहानेही शंभरी पार केली. कामठी मिलिटरी हॉस्पिटलमधील चौघे कोरोनाबाधित आढळले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरात सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढतो आहे. कोरोनाबाधिताची एकूण संख्या 1707 झाली असून आरोग्य यंत्रणेसोबत आता कारागृहातील पोलिस, कैद्यांच्या जीवालाही घोर लागला आहे. कारागृह, कामठी येथील मिलिटरी हॉस्पिटल, रामटेक, झिंगाबाई टाकळी, अजनी रेल्वे क्वार्टर, खापरी, गांधीनगर आणि प्रेमनगरातही आज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

मेयो येथील लॅबमधून 16 नमुने, एम्समधील 6, माफसूतील एक, खाजगी लॅबमधून तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. मेयो हॉस्पिटलमधील नमुने तपासणीत कामठी मिलिटरी रुग्णालयातील 4, कारागृहातील 7, रामटेकमधील तीन, झिंगाबाई टाकळी व अजनी रेल्वे क्वार्टरमधील प्रत्येकी एकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. एम्समधील सहा पॉझिटिव्ह नमुने व्हीएनआयटी विलगीकरण केंद्रातील नागरिकांचे आहेत. हॉटेलमधील विलगीकरण केंद्रात असलेल्या एकाचा नमुना माफसूच्या लॅबमधून पॉझिटिव्ह आला. खापरी, गांधीनगर आणि प्रेमनगरातील प्रत्येकी एकाला कोरोना झाल्याचे खाजगी लॅबमधील नमुना तपासणीतून आढळले.

ठळक बातमी - मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

49 कैदी पॉझिटिव्ह
कारागृहात आज सात जण कोरोनाबाधित आढळून आले. कारागृहातील कोरोनाबाधितांची संख्या आता 103 झाली आहे. यात कैद्याची संख्या 49 पर्यंत पोहोचली. काल, शुक्रवारी कारागृहात 30 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. सतरंजीपुरा, मोमीनपुरा आणि बांगलादेशनंतर कारागृहात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आले. गेल्या चार दिवसांत कारागृहातील कोरोनाबाधितांचे शतक पूर्ण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com