नागपुरात कोरोनाचा प्रकोप समूह संसर्गाच्या दिशेने? आज तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद.. वाचा सविस्तर..    

225 new corona patients and 7 people no more in nagpur district today
225 new corona patients and 7 people no more in nagpur district today

नागपूर:  नागपूर जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवूनही कोरोनाचा प्रकोप थांबण्याची काहीही शक्यता दिसत नाही. त्यातच आज जिल्ह्यातुन कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

आज (ता. 26) ला कोरोनाच्या तब्बल 225 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्यात दर दिवसाला कोरोनाच्या मृत्यूचा खेळ नागपूर अनुभवत आहे. रविवारी आणखी 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना मृत्यूची ही साखळी खंडीत होण्याऐवजी चिंताजनक स्थिती धारण करीत आहे. सात जण दगावल्याने नागपुरात मृत्यूचा आकडा 83 वर पोहोचला आहे. तर रविवारी एकाच दिवशी शहरात 175 तर ग्रामीण भागात 53 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे बाधितांची संख्या चार हजार पार झाली आहे. 

आज नागपुरात झालेले मृत्यू - 

पाच तास घरी पडून होता मृतदेह-
 

कोरोनाचे रुग्णाचा घरीच मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कामठीत एकाचा घरीच मृत्यू झाल्यानंतर पाच तास मृतदेह पडून होता.

लष्करीबागेतील 63 वर्षीय व्यक्तीचा मेयोत मृत्यू -
 
लष्करीबाग येथील 63 वर्षीय व्यक्ती रविवारी (ता.26) पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी मेयोत दगावली. अवघ्या दोन तासांपूर्वी या व्यक्तीला मेयोत दाखल केले होते. उच्च रक्तदाबासह मधुमेहामुळे श्‍वास घेणे कठिण झाले होते. कोरोना चाचणीत बाधा झाल्याचा अहवाल आला आणि त्यांचा मृत्यू झाला. 

बैतुलच्या कोठी बाजार तर गोधनीतील एकाचा मृत्यू - 

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बैतुलच्या कोठी बाजार येथील 65 वर्षीय व्यक्तीसह नागपूरच्या गोधनी परिसरातील 49 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाना मृत्यू झाला. यातील 49 वर्षीय व्यक्तीवर 14 जुलैपासून मेयोत उपचार सुरू होते. दारुच्या व्यसनामुळे त्याला कावीळ झाला होता. याशिवाय न्युमोनिया होता. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीवर 19 जुलैपासून मेयोत कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला होता. श्‍वास घेणे कठीण झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

कामठी, अजनीतील रुग्णांचा मृत्यू -

43 वर्षीय कामठीतील एका व्यक्तीचा मेयोत मृत्यू झाला. मेडिकलमध्ये 2 जण दगावले. कामठी येथील छत्रपतीनगरातील 45 वर्षीय महिलेसह अजनी येथील 48 वर्षीय व्यक्ती दगावली. मेडिकलमध्ये दगावलेल्या 48 वर्षीय युवकाला रविवारी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी दाखल केले आणि सकाळी 10 वाजून 30 मिनटांनी मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना झाल्याचे उघड झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com