कोचिंग क्लासेसमधील ४० टक्के विद्यार्थी गळाले; कोट्यवधींचा फटका

40 percent less students in coaching classes
40 percent less students in coaching classes

नागपूर : कोरोनामुळे टाळेबंदी केल्याने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले होते. लवकरच कोचिंग क्लासेस सुरू होतील. मात्र, सध्या ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने जिल्ह्याबाहेरील ४० टक्के विद्यार्थी गळाल्याने खासगी शिकवणी वर्ग चालकांना मोठा फटका बसला आहे.

शहरातील किमान आठशे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेईई, नीट, ऑलिम्पियाड, सीए आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी वर्ग घेतल्या जाते. येथील विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नावही कमावले आहे. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येत आहे.

नागपुरातील क्लासेसमध्ये भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यातून विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे वर्ग बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय देण्यात आला. मात्र, या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनाही योग्यरीत्या आकलन करता येणे अशक्य झाले. यातूनच बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी आपापल्या जिल्ह्यातील खासगी शिकवणी वर्गांना पसंती देत आहेत.

विशेष म्हणजे नागपूरच्या काही नामांकित क्लासेसमध्ये २ ते ४ हजारावर विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, यावर्षी हा आकडा ४०० ते ५०० पर्यंत आला आहे. त्यामुळे या क्लासेसला कोट्यवधींचा फटका बसला आहे. तसेच कोरोनाची भीती कायम असल्याने पाल्यांना शाळेत पाठविण्याची पालकांची अद्याप मानसिकता झाली नाही. 

रेसिडेन्स कोचिंग बंदच

कोरोनामुळे शाळा, वसतिगृहे आणि क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे रेसिडेन्स कोचिंग जवळपास बंद करण्यात आले. या रेसिडेन्स कोचिंग सेंटरमध्ये विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील विद्यार्थी शहरात राहत होते. मात्र, आता टाळेबंदीमुळे रेसिडेन्स कोचिंग बंद आहेत. 

सर्वकाही सुरळीत होण्याची शक्यता
पालकांची मानसिकता नसल्याने यावर्षी बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी आलेले नाहीत हा बाब खरी आहे. आता जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या सत्रात सर्वकाही सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा फटका कोचिंग क्लासेसला बसला आहे. 
- डॉ. समीर फाले,
कोषाध्यक्ष, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com