नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या १० लाखांजवळ; आज नवे ४६७ रुग्ण 

केवल जीवनतारे 
Wednesday, 13 January 2021

जिल्हयात कोरोनाचा विळखा पडून दगावणाऱ्यांचा टक्का कमी झाला आहे. आज दगावलेल्या सात जणांमध्ये शहरातील २ तर ग्रामीण भागातील १ आणि जिल्ह्याबाहेरच्या ४ जणांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनाच्या बाधेने दगावलेल्यांची संख्या ४ हजार ४२ झाली आहे

नागपूर ः जिल्ह्यात दहा महिन्यानंतर कोरनाचा प्रकोप घसरणीला आला आहे. आज दिवसभरात तपासलेल्या ४ हजार ७८८ संशयितांपैकी ४६७ जण प्रयोगशाळेतील अहवालातून कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर उपचार घेत असलेले ३५८ जणांची कोरोनाच्या लक्षणांमधून मुक्तता झाली आहे. त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले. दर मागील २४ तासांमध्ये ७ जण दगावले आहे. विशेष असे की, आतापर्यंत जिल्ह्यात १० लाखांजवळ कोरोना चाचण्या पोहचल्या आहेत.

जिल्हयात कोरोनाचा विळखा पडून दगावणाऱ्यांचा टक्का कमी झाला आहे. आज दगावलेल्या सात जणांमध्ये शहरातील २ तर ग्रामीण भागातील १ आणि जिल्ह्याबाहेरच्या ४ जणांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनाच्या बाधेने दगावलेल्यांची संख्या ४ हजार ४२ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील विविध कोरोना चाचणी केंद्रातून कोरोनाबाधित आलेल्यांची संख्या ४६७ होती. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

यातील ४०३ जण शहरातील तर ६० जण ग्रामीण भागातील आहेत. ४ जण जिल्ह्याबाहेरच आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २९ हजार २२५ वर पोहचला आहे. तर जण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर ३३१ जण हे महापालिकेच्या हद्दीतील रहिवासी आहेत. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ७३५१ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. 

सद्या जिल्हयात ४ हजार ६३५ सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आहे. यातील विविध रुग्णालयात १ हजार ४३६ जणांवर कोरोना आजारावर उपचार सुरू आहेत. यात ३ हजार ५५८ जण शहरातील आहेत. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या १०७७ आहे. गृहविलगीकरणात सुमारे ३ हजार १९९ जण आहेत. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

जिल्हात आतापर्यंत झालेल्या ९ लाख ९९ हजार ९०४ चाचण्यांमध्ये ६ लाख १९ हजार ७४३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर ३ लाख ७१ हजार १६१ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत.दिवसभरात शहरातील २९४ आणि ग्रामीण भागातील ६४ अशा एकूण ३५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत १ लाख २० हजार ५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 467 new corona patients today in Nagpur