नागपुरातील तब्बल ४८ हवालदार झाले पोलिस अधिकारी;  दिवाळीपूर्वीच मिळाले गिफ्ट

48 constables in nagpur become police officers
48 constables in nagpur become police officers

नागपूर ः गेल्या सात वर्षांपासून चातकाप्रमाणे पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या पोलिस हवालदारांंना एकदाची पदोन्नती मिळाली. नागपुरातील तब्बल ४८ हवालदार पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांनी दिवाळीपूर्वीच गिफ्ट दिल्यामुळे पोलिस परीवारात आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित करीत हवालदारांच्या पदोन्नतीचा प्रश्‍न लावून धरला होता. 

२०१३ ला घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षक अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास १८ हजार पोलिस हवालदार उत्तीर्ण झाले होते. काहींना पदोन्नती देण्यात येत होती. मात्र तेव्हापासून पदोन्नती देणे थांबविण्यात आले होते. त्यामुळे राज्य पोलिस दलात नाराजीचा सूर होता. राष्ट्र निर्माण संघटनेचे निलेश नागोलकर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकापर्यंत पदोन्नतीचा तिढा पोहचवला होता. 

तसेच अर्हता परीक्षा उत्तीर्ण हवालदारांना पदोन्नतीसाठीच्या लढ्यात ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित करीत पाठपुरवठा केला होता. त्यामुळे मंगळवारी पोलिस महासंचालक कार्यालयातून राज्यातील १०६१ पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची यादी प्रकाशित केली. या यादीत नागपूर शहर पोलिस दलातील ४८ पोलिस हवालदारांचा समावेश आहे. 

यांना मिळाली पदोन्नती

शहर पोलिस आयुक्तालयात पदोन्नती मिळालेल्यांमध्ये राजेश राऊत, शरद पवार, प्रमोद पारखी, श्यामराव कावनपुरे, राजकुमार उपाध्याय, अनिल मांगलकर, किशोर सोलव, अविनाश अक्कावार, घनश्याम तिवारी, स्टेलिन अंथोनी, अशोक गवई, किशोर डांगोरे, अनिल चौधरी, संजय खोब्रागडे, धरमदास सावरकर, राजेश नाईक, जेवियर रास, महादेव कोरपे, हेमंतकुमार नंदेश्वर, दिलीप नागपुरे, किशोर सातोकर, रविंद्र हुमने, महावीर खोंडे, नवनाथ रायपूरे, राष्ट्रपाल सवईतुल, देवेंद्र रायबोले, संतोष पांडेय, राजेशकुमार मौर्य, चंद्रकांत पाचोडे, प्रकाश अहिरे, शिवसागर मिश्रा, तुळशीराम राऊत, अशोक तिडके, इजराईल शरीफ, ज्ञानदेव तायडे, देवीदास बांगडे, विश्वास ठाकरे, जगदीश मोहिते, अब्दुल शकील शेख, शैलेंद्र ठाकुर, अरविंद मोहोड यांचा समावेश आहे. तसेच नागपूर ग्रामिण पोलिस दलातून संजय जासुतकर, सूर्यप्रकाश मिश्रा, श्रवणकुमार तिवारी, देवेंद्र सोनवले, विनायक नागुलवार, सुनील अंबरते आणि देवेंद्र गणवीर यांना पदोन्नती मिळाली आहे.

आम्ही आभारी आहोत...! 
पीएसआय परीक्षा पास होऊनसुद्धा कर्मचाऱ्याच्या वर्दीत ड्युटीवर जावे लागत होते. त्यामुळे कुटुंबियसुद्धा वारंवार पदोन्नतीबाबत विचारणा करीत होते. त्यामुळे आम्ही हतबल झालो होतो. मात्र, ‘सकाळ’ने आमचा प्रश्‍न उचलून धरला, त्यामुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला होता. अखेर आम्हाला एकदाचे अधिकारी पद मिळाले, आम्ही ‘सकाळ’ आणि गृहमंत्री साहेबांचे शतशः आभारी आहोत. 
- नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com