दिव्यांगांना घर, पाणी करात 50 टक्के सवलत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

ळी अंत्योदय योजनेंतर्गत दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप, मतिमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजना सुरू करणे, दिव्यांग बचतगटांना सामूहिक तथा वैयक्‍तिक लाभाच्या योजनेअंतर्गत व्यवसायाकरिता अर्थसाहाय्य करणे, शहरातील दिव्यांगांना मोटाराईज स्ट्रायसिकल वाटप करणे, दिव्यांगांना व्यावसायाकरिता जागा उपलब्ध करून देणे, दिव्यांग व्यक्तींना बाजार विभागामार्फत ओटे, गाळे उपलब्ध करून देणे, महानगरपालिकेअंतर्गत येत असलेल्या दिव्यांग बांधवांना रेल्वे विभागामार्फत देण्यात येत असलेल्या ई-तिकीट स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देणे यावर चर्चा करण्यात आली. https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/two-boyes-injured-quarrel-road-249990

नागपूर : दिव्यांगांना घर आणि पाणी करात 50 टक्के सवलती देण्याचा प्रस्ताव तयार करून लवकरच सभागृहापुढे मांडण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी चार विशेष उद्याने तयार करण्याचाही महापालिका विचार करीत आहे. व्यवसायाकरिता दिव्यांगांना शहरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर झोनस्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आज दिले.

हे वाचाच - निघाल्या तलवारी आणि झाले सपासप वार
 
महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत दिव्यांग कल्याण योजना समिती गठित केली आहे. या समितीच्या बैठकीत महापौरांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सदस्य दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी श्री. मडावी, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाटे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, अभिजित राऊत आदी उपस्थित होते. यावेळी अंत्योदय योजनेंतर्गत दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप, मतिमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजना सुरू करणे, दिव्यांग बचतगटांना सामूहिक तथा वैयक्‍तिक लाभाच्या योजनेअंतर्गत व्यवसायाकरिता अर्थसाहाय्य करणे, शहरातील दिव्यांगांना मोटाराईज स्ट्रायसिकल वाटप करणे, दिव्यांगांना व्यावसायाकरिता जागा उपलब्ध करून देणे, दिव्यांग व्यक्तींना बाजार विभागामार्फत ओटे, गाळे उपलब्ध करून देणे, महानगरपालिकेअंतर्गत येत असलेल्या दिव्यांग बांधवांना रेल्वे विभागामार्फत देण्यात येत असलेल्या ई-तिकीट स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देणे यावर चर्चा करण्यात आली. दिव्यांग बचतगटांना व्यवसायाकरिता अर्थसाहाय्य करताना त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देणे तसेच त्यांचे योग्य समुदेशन केले जात असल्याचीही माहिती यावेळी सादर करण्यात आली. दिव्यांगांसाठी उद्यानात विशेष उपकरणांबाबत कार्यवाही सुरू असून, येत्या 17 जानेवारीला तीन उद्यानांबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मागील वर्षभरात विशेष मोहिमेंतर्गत शहरातील 3334 दिव्यांगांना प्रमाणपत्र व स्मार्ट कार्ड देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी दिली.

दिव्यांगांसाठी मनपाचा निर्धार

  • शहर बसमध्ये दिव्यांगांना व त्यांच्या मदतनिसांना 100 टक्के सवलत
  • बस स्थानक व डेपोत इलेक्‍ट्रिक व्हीलचेअर
  • अंत्योदय योजनेंतर्गत दिव्यांगांना 70 ई-रिक्षांचे लवकरच वाटप, लकी ड्रॉ काढणार
  • व्यवसायासाठी 70 फिरत्या स्टॉल्ससाठी अर्ज मागविणार
  • दिव्यांगांना घरकुल योजनेंतर्गत मनपातर्फे 50 टक्के अनुदान
  • स्वतंत्र दिव्यांग कक्ष
  • म्युझिक थेरेपी
  • दिव्यांगांसाठी स्पर्धांचे आयोजन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50% discount on home, water tax for the disabled