'एचसीबी'चे ६०३ वकील 'डिफॉल्टर', शुल्क न भरल्याने गमावला मतदानाचा अधिकार

603 lawyer of high bar association lost the right to vote due to non payment of fees nagpur news
603 lawyer of high bar association lost the right to vote due to non payment of fees nagpur news

नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरची निवडणूक १२ मार्च २०२१ रोजी होणार आहे. एचसीबीएच्या २ हजार ४५० सदस्यांपैकी यावर्षी १ हजार ८४७ जणांनी सदस्यता शुल्क भरले. तर, ६०३ वकिलांनी शुल्कच भरले नाही. परिणामी, शुल्क न भरणाऱ्या वकिलांना मतदान करता येणार नाही. आज शुल्क भरणाऱ्या सदस्यांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सदस्यता शुल्क भरणाऱ्या सदस्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

एचसीबीएने जारी केलेल्या सूचनापत्रानुसार, १६ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ४५० सदस्यांपैकी १ हजार ८४७ सदस्यांनी निवडणूक समितीकडे शुल्क भरले आहे. त्यामुळे या १ हजार ८४७ वकिलांना यंदा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आज (ता. १७) पासून उमेदवारांसाठी नामनिर्देश अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर, २५ फेब्रुवारी नामनिर्देश अर्ज भरण्याची अंतिम तारीख राहणार असून दुपारी ४.३० वाजतानंतर अर्जातील त्रुटींसंदर्भातील यादी प्रकाशित करण्यात येईल. ३ मार्च रोजी उमेदवारांना नामनिर्देश अर्ज मागे घेता येतील. दुपारी ४.४५ नंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. १२ मार्च रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एचसीबीएची निवडणूक होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.३० नंतर मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी अ‍ॅड. प्रकाश मेघे, अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, अ‍ॅड. अरुण पाटील, अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर व अ‍ॅड. फिरदोस मिर्झा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

१६ पदांसाठी निवडणूक - 
बुधवार १७ फेब्रुवारीपासून नामनिर्देश अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे, एचसीबीएच्या निवडणुकीत कोण नामनिर्देश अर्ज भरणार, कोण कुणाला पाठिंबा देणार या चर्चांमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. एचसीबीएचे अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव, एक सहसचिव, एक ग्रंथपाल प्रभारी, एक कोषाध्यक्ष व ९ सदस्य असे एकूण १६ पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com