लसीकरण सुरू झाल्यावरही कोरोनाचे नवे रुग्ण, आठ जणांचा मृत्यू

राजेश प्रायकर
Saturday, 23 January 2021

कोरोनाचे सावट कायम असून गेल्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील तिघांचा तर ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत.

नागपूर : कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी अद्यापही नवे रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी अडीचशे नव्या बाधितांची नोंद करण्यात आली असून आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. 

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

कोरोनाचे सावट कायम असून गेल्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील तिघांचा तर ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत. या मृत्यूसह कोरोनाबळींची संख्या ४ हजार ११४ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील २ हजार ७१३ तर ग्रामीण भागातील ७३१ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ६७० जणांनी शेवटचा श्वास घेतला. शहरातील विविध लॅबमधून आलेल्या अहवालातून आज २५० जण बाधित आढळले. यात १७५ शहरातील असून ७२ ग्रामीण भागातील आहेत. तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत.

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

आता बाधितांची एकूण संख्या १ लाख ३१ हजार ७९० पर्यंत पोहोचली. यात १ लाख ४ हजार ६०९ जण शहरातील आहेत. २६ हजार ३२९ ग्रामीणमधील बाधितांची संख्या आहे. जिल्ह्याबाहेरील ८५२ जण शहरात बाधित आढळले. जिल्ह्यात आज ३९३ जण कोरोनामुक्त झाले. यात ३०६ जण शहरातील असून ८२ जण ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत १ लाख २४ हजार ३५ जणांनी कोरोनावर मात केली. यात ९९ हजार २५५ शहरातील आहेत. कोरोनामुक्त झालेले ग्रामीणमधील २४ हजार ७८० आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ६४१ जण विलगीकरणात असून उपचार घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 died due to corona in nagpur