व्यवसाय डिस्पोजल विक्रीचा अन्‌ कर्ज चार लाखांवर, मग रात्र गेली ओलीस... काय झाले असावे ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

चहाचे कप व डिस्पोजल विक्रीचा छोटासा व्यवसाय... कर्ज मात्र चार लाखांवर गेलेले... व्यावसायिकांकडून सतत पैशांची मागणी सुरू... काहीही केल्या पैसे परत करता येत नव्हते... पैसे परत मिळणार असे वाटत असताना व्यापारांनी केले असे...

नागपूर : 22 वर्षांचा तरुण चहाचे कप व डिस्पोजल साहित्य विक्री करून उदारनिर्वाह करायचा. तो काही लोकांकडून उसनवारीवर माल विकत घ्यायचा. मात्र, त्याचा व्यवसाय पाहिजे तसा चालत नव्हता. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तो निराश झाला होता. दुसरीकडे व्यापारी कर्जासाठी तगादा लावत होते. काहीही केल्या तो पैस परत करू शकत नव्हता. सतत तगादा लावल्यावरही उपयोग न झाल्याने व्यापाऱ्यांनी त्याचे अपहरणच केले. अभिषेक प्रकाश जबलपुरे (22, रा. चित्रा टॉकीजजवळ, गवळीपुरा) असे अपहृत व्यावसायिकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक जबलपुरे याचे चहाचे कप व डिस्पोजल साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. ग्रीन पार्क, हिंगणा येथील रहिवासी दानिश खान (26), शादाब इकबाल खान (25), इरशाद इकबाल खान (26) यांच्याकडून तो उधारीवर माल आणायचा. हळूहळू उधारीची रक्कम वाढत जाऊन तब्बल साडेतीन लाखांवर पोहोचली. उधारीच्या पैशांवरून खान बंधूंचा अभिषेकसोबत वाद सुरू होता.

kidnapping साठी इमेज परिणाम

बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दानिश आणि शादाब हे दोघे अभिषेकच्या घरासमोर आले. त्याला बाहेर बोलावले आणि बळजबरीने आपल्या बुलेटवर बसवून घेऊन गेले. आरोपींचे साथीदार इरशाद, अमीर बालाघाटे, दानिश बालाघाटे पूर्वीपासूनच क्रिटीकेअर हॉस्पिटलजवळ चारचाकी वाहन घेऊन उभे होते. आरोपी अभिषेकला थेट त्यांच्याकडे घेऊन गेले. यानंतर आरोपींनी त्याला कारमध्ये बसविले आणि हिंगणा येथील रेमॅक्‍सन इंडस्ट्री रोड येथे नेले. तिथे रात्रभर डांबून ठेवून जबर मारहाण करण्यात आली. व्यावसायिकाने कशीबशी स्वत:ची सुटका करवून घेत कोतवाली ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवीत आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

काय झालं असावे ? - आठवडी बाजारासाठी ते गप्पा मारत निघाले आणि थरकाप उडाला, वाचा काय झाले...

ठार मारण्याची धमकी

अभिषेकचे अपहरण केल्यानंतर उधारीच्या पैशांची मागणी करीत ठार मारण्याची धमकी दिली. रात्रभर ओलीस ठेवल्यानंतर अभिषेक हादरला. कसेही करून एखाद्या मित्राकडून पैसे जमवून देण्याची ग्वाही आरोपींना दिली. त्यावर विश्‍वास ठेवून आरोपींनी त्याला शहरात आणले. संधी साधून तो आरोपींच्या तावडीतून निसटला. कोतवाली ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abduction of businessmen in Nagpur