अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसाने मागितली लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली तक्रार आणि...

ACB arrested Ajni's corrupt PSI Rajesh Thakur
ACB arrested Ajni's corrupt PSI Rajesh Thakur

नागपूर : भंगारविक्रेत्याकडून माल कमविल्यानंतर तक्रारदारांकडून एक लाखाची लाच घेणारा अजनीचा वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक राजेशसिंग केशवसिंग ठाकूर (वय 56, रा. शांतीनगर) याला एसीबीने अटक केली. ही कारवाई आज दुपारी दोन वाजता शताब्दी चौकात केली. या कारवाईमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेल्वेत पार्सल कंत्राटदार आहेत. त्याचा बोरकरनगर भागात भूखंड आहे. या प्लॉटवर भंगारविक्रेता गोपालसिंग याने अतिक्रमण केले आहे. यावरून तक्रारदार व गोपालसिंग या दोघांमध्ये वाद सुरू आहे. गोपालसिंग याच्या तक्रारीवरून अजनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदाराविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमविल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. 

याप्रकरणाचा तपास पीएसआय राजेश ठाकूर यांच्याकडे आहे. या प्रकरणात ठाकूर यांनी तक्रारदाराला अटक केली होती. प्लॉट रिकामा करून देण्यासाठी ठाकूर यांनी तक्रारदाराला तीन लाख रुपयांची लाच मागितले. एवढी रक्कम देण्यास तक्रारदाराने असमर्थता दर्शविली. "दीड लाख रुपये दे,' असे ठाकूर हे तक्रारदाराला म्हणाले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या महिला निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी शताब्दी चौकात सापळा रचला. लाच घेताच एसीबीच्या पथकाने ठाकूर यांना अटक केली. ठाकूर यांच्याविरुद्ध अजनी पोलिस स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जरीपटक्‍यात डबल मर्डर दाबण्याचा प्रयत्न 


पीएसआय राजेशसिंग ठाकूर याने जरीपटक्‍यातील डबल मर्डर दाबण्याचा प्रयत्न केला होता. टोळीयुद्धातून दोन युवकांना ठार मारून रेल्वेखाली फेकून देण्यात आले होते. मात्र, पीएसआय ठाकूर याने प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करीत डबल मर्डर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी मृतांच्या नातेवाइकांनी आयुक्‍तांकडे तक्रार केल्यानंतर हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com