आयुक्त तुकाराम मुंढे यांची आदित्य ठाकरे यांनी का केली स्तुती...जाणून घ्या

राजेश प्रायकर
शुक्रवार, 10 जुलै 2020

आयुक्त मुंढे यांनी राज्य शासनाकडे अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 

नागपूर :  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवारी सकाळी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नावीन्यपूर्ण उपाय करून नागपुरात कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली. आता राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा कॉंटॅक्‍ट ट्रेसिंगवर जोर दिल्या जात असल्याचे ठाकरे म्हणाले.

महानगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनीतीवर जास्त भर दिला पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी पालिकेला केल्या. ठाकरे यांनी पालिकेद्वारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग न्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरचीही प्रशंसा केली. 500 खाटा तयार आहेत आणि जर आवश्‍यकता भासली तर त्याची क्षमता 5000 पर्यंत केली जाऊ शकते, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

आयुक्त मुंढे यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती मंत्र्यांना दिली. केंद्र शासनाच्या पथकानेसुद्धा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या 500 पर्यंत नेली.

घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. आयुक्त मुंढे यांनी राज्य शासनाकडे अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 

नागपूर महानगरपालिकेचे कौतुक

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्युदर कमीत-कमी ठेवण्यासाठी राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी आयुक्तांच्या कामाचीही स्तुती केली. 

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray praises the work of Corona control in nagpur