आदित्य ठाकरे विचारणार पतंप्रधान नरेंद्र मोदींना हा प्रश्‍न...

मंगेश गोमासे
Thursday, 16 January 2020

नागपूर : मथळा वाचून तुम्हाला वाटले असेल की युवासेना प्रमुख व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार असतील. मात्र असे नाही आहे. मुंबई प्रमाणे नागपुरात देखील एक आदित्य ठाकरे आहेत. हे आदित्य ठाकरे राजकारणात नसून शाळेत जातात... वाटलं ना आश्चर्य? होय हे खरं आहे.  नागपूरचा आदित्य ठाकरे पतंप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्‍न विचारणार आहे.

नागपूर : मथळा वाचून तुम्हाला वाटले असेल की युवासेना प्रमुख व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार असतील. मात्र असे नाही आहे. मुंबई प्रमाणे नागपुरात देखील एक आदित्य ठाकरे आहेत. हे आदित्य ठाकरे राजकारणात नसून शाळेत जातात... वाटलं ना आश्चर्य? होय हे खरं आहे.  नागपूरचा आदित्य ठाकरे पतंप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्‍न विचारणार आहे.

देशभरात फेब्रुवारी महिन्यात सीबीएसईसह राज्यातील विविध बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षांच्या अनुषंगाने दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी (ता.19) "परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमात शहरातील हनुमाननगर येथील साऊथ पॉईन्ट स्कूलचा आदित्य ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्‍न विचारणार आहे.

Image may contain: 3 people, people smiling, people standing and suit
आदित्य ठाकरे, नागपूर

सीबीएसईद्वारे फेब्रुवारी महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर अभ्यासाचा भरपूर ताण असतो. हा ताण वाढल्यास त्यांच्या डोक्‍यावर विपरित परिणाम होऊन पेपर बिघडण्याची शक्‍यता अधिक असते. नरेंद्र मोदी हे आपल्या अनुभवातून या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण टिप्स देणार आहेत. पंतप्रधान दरवर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वी "मन की बात' या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. मात्र, यावर्षी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून त्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देणार आहेत.

हेही वाचा - ऊर्जामंत्री म्हणतात, जनतेवर वीजदरवाढीचा बोजा पडू देणार नाही

मुलांमध्ये राष्ट्रीयत्वाचा भाव आणण्यासाठी काय करायला हवे?
यासाठी अगोदरच विद्यार्थ्यांकडून प्रश्‍न मागविण्यात आलेत. त्या प्रश्‍नांमधून राज्यातील अकरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हनुमाननगर येथील आदित्य राजेंद्र ठाकरे या नववीतील विद्यार्थ्याचा समावेश आहे. तो पंतप्रधानांना देशातील मुलांमध्ये राष्ट्रीयत्वाचा भाव आणण्यासाठी काय करायला हवे? असा प्रश्‍न विचारणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya thakre to ask question to prime minister narendra modi