भरमसाठ वीज बिलामुळे आक्रोश, आंदोलकांनी गाठले ऊर्जामंत्र्यांचे घर आणि...

योगेश बरवड
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनाचे संकट ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात वीजबिल आम्ही भरू शकत नाही. यामुळे वीजबिल सरकारने भरावे, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमधील 120 तालुक्‍यांमध्ये आंदोलन करण्यात आले. स्थानिक महावितरणच्या कार्यालयात जाऊन विदर्भवाद्यांनी त्यांना आलेले बील परत केले. 

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी संपूर्ण विदर्भात "वीजबिल वापसी आंदोलन' करण्यात आले. नागपुरात बेझनबाग येथील ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घरासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. डॉ. राऊत यांना बील परत देण्यासाठी आंदोलक जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

भरमसाठ वीजबिलामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. वीज दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षाने एल्गार पुकारला असून टप्पेनिहाय आंदोलन करण्यात येत आहे. त्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीनेही उडी घेतली आहे.

कोरोनाचे संकट ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात वीजबिल आम्ही भरू शकत नाही. यामुळे वीजबिल सरकारने भरावे, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमधील 120 तालुक्‍यांमध्ये आंदोलन करण्यात आले. स्थानिक महावितरणच्या कार्यालयात जाऊन विदर्भवाद्यांनी त्यांना आलेले बील परत केले. 

नागपुरात समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात दुपारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निवास्थानापुढे घोषणा देण्यात आल्या. पूर्व सूचनेप्रमाणे आंदोलक वीजबिल परत करण्यासाठी डॉ. राऊत यांच्या घराच्या घराच्या दिशने निघताच पोलिसांनी त्यांना अटकाव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांचा पुढे जाण्याचा प्रयत्न सुरूच होता. यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...

पोलिसांच्या गाडीत टाकून त्यांना इतरत्र नेण्यात आले. "लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे', "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे', "वीज दरवाढ मागे घ्या' आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे आम्ही देणार नाही, कोरोनानंतरच्या काळात 200 युनिटपर्यंत विज नि:शुल्क द्या, त्यानंतरचे विजेचे दर निम्मे करा, शेती पंपाचे वीजबिल संपवा आदी विदर्भवाद्यांच्या मागण्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा राम नेवले यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation in front of energy minister's house