नागपुरातील दिघोरी परिसरात आढळला अतिदुर्मिळ 'अल्बीनो तस्कर' साप; सर्पमित्रांनी केलं रेस्क्यू 

Albino smugglers' snake found in Dighori area nagpur
Albino smugglers' snake found in Dighori area nagpur

नागपूर : भल्या पहाटे साई नगर दिघोरी नागपूर निवासी राघोर्ते यांच्या घराच्या अंगणात पांढरा शुभ्र 1 फूट लांबीचा साप दिसला व पाहता पाहता तो तुळशी वृदांवनाच्या खालच्या भागातील काँक्रीट च्या खाली शिरला. पांढऱ्या रंगाचा साप दिसल्यामुळे घरच्यांना आश्चर्यचा धक्काच बसला. 

ह्या सापाला सुखरूप पकडण्यात यावे म्हणून सर्पमित्र अभिषेक देवगिरीकर, प्रतीक वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सर्पमित्रांनी काही वेळातच घटनास्थळ गाठले व एक तासाच्या श्रमानानंतर सापाला रेस्क्यू करण्यात यश मिळाले. ह्या पांढऱ्या रंगाच्या सापाविषयी नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे सर्पमित्रांनी निराकरण केले.

तस्कर सापाला इंग्रजीमध्ये "Trinket snake" म्हणतात. हा बिनविषारी असून नागपूरमध्ये सर्वत्र आढळतो. अल्बीनो तस्कर साप अत्यंत दुर्मिळ असून दिसायला अति सुंदर पांढऱ्या रंगाचा असतो व डोळे लाल-गुलाबी असतात. अल्बीनो तस्कर साप ही वेगळी जात नसून सापाच्या डी.एन.ए मध्ये विशेष बदल झाल्याने सापाची त्वचा पांढरी पडत असते.  

सापाच्या शरीरातील मेल्यालिन प्रमाण कमी झाल्याने सापाच्या त्वचेचा रंग हलूहळू फिक्कट पडत जातो व पुढे सापाची त्वचा पांढरी होत जाते. अल्बीनिझम ही अनुवांशिक घटना असते, जन्म होण्याच्या वेळी सापाच्या अंड्याना मिळणारी ऊब तसेच वातावरणातील बदलांमुळे अंड्यातील सापांमध्ये रंगद्रव्याचा अभाव होतो त्यामूळे सापाची त्वचा पांढरी होते. अल्बीनो साप त्याच्या रंगामुळे आकर्षणाचा विषय बनतो. ह्या सापाला आवश्यक अशा अनुकुल वातावरणाचा विचार करून निसर्गात मुक्त केल्या गेले.

शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढते काँक्रीटचे जंगल, मोकाट जमिनीचा ऱ्हास, झुडपी जंगलांचा नाश ह्यामुळे सापांच्या अधिवासावर परिणाम झाला आहे त्यामुळे नाईलाजाने साप मानवाच्या संपर्कात येत आहेत. सर्पमित्रांच्या सहकार्याने असंख्य सापांना जीवनदान तर मिळतेच व लोकांच्या मनातील भीती व अंधश्रद्धा देखील दूर केल्या जात आहेत. पर्यावरणाचे संतुलन, सापांचे संवर्धन करण्यास सर्पमित्र महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 
 - स्वप्नील बोधाने 
(पशुकल्याण अधिकारी महा. राज्य)

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com