कोरोना काळात अंनिसने घेतला गरजूंच्या मदतीचा वसा

ans
ans

नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस)च्या नागपूर जिल्ह्यातील विविध शाखांद्वारे लॉकडाऊनमध्ये गरजूंना विविध प्रकारची मदत करण्यात आली. नागपूर जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक जिल्हाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या अध्यक्षते खाली, राज्य सरचिटणीस संजय शेंडे व जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यामध्ये केलेल्या कार्याचा संपूर्ण वृत्तांत मांडण्यात आला.
या आँनलाईन बैठकीला जिल्ह्यातील सर्व शाखांमधून सुमारे २४ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र अनिसतर्फे विज्ञान दिन, पर्यावरण पूरक होळी, मानस मित्र समुपदेशन व गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे मोफत वितरण इत्यादी उपक्रम राबविले गेले. कार्यकर्त्यांसाठी आँनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचा ठराव मंजूरही करण्यात आला. उत्तर नागपूर शाखेतर्फे जिल्हा प्रधान सचिव राम डोंगरे यांच्या पुढाकारातून केलेल्या उपक्रमात ४०० लाभार्थींना लाभ मिळाला. सांस्कृतिक जिल्हा कार्यवाहक प्रिया गजभिये यांनी अन्नधान्य वितरण मोफत पॅकिंग सेवा प्रदान केली. हिंगणा शाखेतर्फे जिल्हा महिला कार्यवाहक नलिनी शेरकुरे यांच्या पुढाकाराने २५० कुटूंबाना मदत पुरविण्यात आली. कोराडी शाखा पदाधिकारी गणेश कांबळे, विष्णू अंभोरे, राजू साळवे आदींनी जीवनावश्यक सामानाच्या किटचे वितरण केले.
जिल्हाध्यक्ष जगजीतसिंह यांनी आप पक्षाच्या सहकार्याने ५५० कुटुंबांना अन्नाचेच वितरण केले. यामध्ये २ हजार ५०० नागरिकांना मदतीसह समुपदेशन मिळाले. रामटेक शाखा कार्याध्यक्षा दीपा चव्हाण यांच्या पुढाकाराने ४५० अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. जिल्हा महिला सहकार्यवाहक अर्चना मेश्राम यांच्या पुढाकाराने ४० कीटचे  वितरण, घरी तयार केलेले १२० मास्क वितरण करण्यात आले. जिल्हा प्रधान सचिव गौरव आळणे यांच्यातर्फे डॉक्टरांच्या सल्ल्याने तिघांचे समुपदेशन करण्यात आले.

पश्चिम नागपूर शाखेचे प्रधान सचिव संजय भलमे यांच्या पुढाकाराने व जनमंच संघटनेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे धान्य वाटप करण्यात आले. राज्य सरचिटणीस संजय शेंडे यांच्यातर्फे २५० गरजूंना वैयक्तिकरित्या जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविली. तसेच दिगंबर, अमित, आनंद मेश्राम, डॉ. सुधा जनबंधु, मेघा उके, रवी सहारे, स्वप्निल हुमने आदी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी यथाशक्ती मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com