अंगणवाड्यांना मिळणार नवी ओळख! देणार प्रेरणादायी स्त्रियांची नावे; हा निर्णय घेणारी नागपूर जिल्हा परिषद पहिलीच

नीलेश डोये
Sunday, 10 January 2021

अंगणवाड्यांची ओळख गाव त्यांच्या क्रमांकाने होते. त्यामुळे या अंगणवाड्यांना थोर, प्रेरणादायी, कर्तृत्ववान महिलांचे नाव देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला. याला समितीने मंजुरी दिली. देशाच्या इतिहासात अनेक महिलांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे राहिले आहे.

नागपूर : राज्यातील अनेक जिल्‍ह्यांत वस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नसल्याने अशी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने एक पाऊल पुढे टाकत अंगणवाड्यांना प्रेरणादायी स्त्रियांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाड्यांना अशाप्रकारे नाव देण्याचा निर्णय घेणारी राज्यात नागपूर जिल्हा परिषद पहिलीच आहे.

अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यात येते. त्यामुळे येथील वातावरण प्रफुल्लित व स्वच्छ असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या किरायाच्या घरात भरतात. त्यामुळे अंगणवाड्यांसाठी इमारत तयार करण्याचा प्रस्ताव महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी भागवत तांबे यांनी तयार केला. याला जिल्हा नियोजन विभागाकडून मंजुरीही देऊन निधीही दिला.

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

अंगणवाड्यांची ओळख गाव त्यांच्या क्रमांकाने होते. त्यामुळे या अंगणवाड्यांना थोर, प्रेरणादायी, कर्तृत्ववान महिलांचे नाव देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला. याला समितीने मंजुरी दिली. देशाच्या इतिहासात अनेक महिलांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे राहिले आहे.

सामाजिक क्षेत्राबरोबरच कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, विज्ञान, संशोधन, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि करीत असलेल्या महिलांच्या नावाने अंगणवाडी ओळखली जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यात २,१६१ अंगणवाड्या व २६२ मिनी अंगणवाड्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीवर प्रेरणादायी महिलेच्या नावाची पाटी लागणार आहे. सोबतच त्यांचे छायाचित्रासह कार्याचा संक्षिप्त इतिहास असणार आहे.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं

महिलांचे योगदान प्रेरणादायी
देशात महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे. गावातील अंगणवाडीच्या माध्यमातून समाजाला व लाभार्थ्यांना अशा थोर महिलांची प्रेरणा मिळण्याचा उद्देश आहे. 
- उज्ज्वला बोढारे,
सभापती, महिला व बालकल्याण समिती

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadis will get the names of inspiring women jilha parishd news