सत्तापरिवर्तनाची वर्षपूर्ती : कॉंग्रेसची सरशी, विरोधकांनीही दाखविली चुणूक 

Anniversary of the change of power in the Nagpur Zilla Parishad
Anniversary of the change of power in the Nagpur Zilla Parishad

नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या टप्‍प्यात काहीसे शांत दिसले. या वर्षभरात राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व दिसले नाही. मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची हातावर घडी तोंडावर बोट, असेच काहीसे चित्र दिसून आले.

पाच वर्षांनी होणारी निवडणूक तब्बल आठ वर्षांनी झाली. कॉंग्रेसला बहुमत मिळाले. १८ जानेवारी २०२० रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदाची माळ रश्मी बर्वे यांना मिळाली. तर उपाध्यक्षपदी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे अत्यंत विश्वासू व खंद्दे समर्थक मनोहर कुंभारे यांची वर्णी लागली. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. जि.प.तही हा पॅटर्न असला तरी सर्व सूत्रे कॉंग्रेसकडे आहेत. जि.प.मध्ये मंत्री सुनील केदार, नाना गावंडे व राजेंद्र मुळक असे तीन गट असून, महत्त्वाची पदे केदार गटाकडे आहेत. कोरोनामुळे कामावर परिणाम झाला. शासनाकडून येणारे अनुदान रखडले. जि.प.च्या तिजोरीत होते नव्हते सर्वच खर्ची गेले. आता सेस फंडात ठणठणाट आहे. 

जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण विकासासाठी येणारा निधी येऊ शकला नाही. परिणामी ग्रामीण विकासाचा वेग खुंटला. यामुळे विरोधकांनी प्रथम सत्ताधाऱ्यांवर आक्रामतेने प्रहार केला. अनेक घोटाळे बाहेर काढले. सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. शेवटच्या टप्प्यात त्यांची तलवार म्यान झाल्याचे चित्र होते. राष्ट्रावादी कॉंग्रेसला मात्र फारशी छाप सोडता आली नाही किंवा अस्तित्वही दिसून आले नाही. सत्ताधाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण दिसून आले.

 
समन्वय साधून काम
गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागले.  जुन्या सत्ताधाऱ्यांना जे ८ वर्षात जमले नाही, ते वर्षभरात करण्यात आले. काही कामे प्रगतीपथावर आहेत. कोरोना काळात कमी मनुष्यबळात चांगले काम कर्मचाऱ्यांनी केले. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उभे करण्यात येत आहेत.  उत्पन्नाचे प्रमाणपत्र न घेणे, मच्छीमारांसंदर्भातील निर्णय घेण्यात आले. विरोधकांना आरोप करण्याची संधी दिली नाही. सर्व पदाधिकारी समन्वय साधून काम करीत आहे.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष



वर्षभरात ठोस काम नाही
ही सत्ताधाऱ्यांची खिसाभरती आहे. शिक्षण विभागातील साहित्य, सिलेंडर, शालेय पोषण आहार आदींसह अनेक घोटाळे केले. त्याचे पुरावे देण्यात आले. चौकशी सुरू झाली. परंतु, काहीच झाले नाही. लाभार्थ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नाही. फक्त सत्ताधाऱ्यांच्याच लाभाच्या योजना सुरू आहेत. वर्षभरात कोणतेही ठोस काम सत्ताधाऱ्यांना करता आले नाही.
अनिल निधान, विरोधी पक्ष नेते.

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com