हा तर निघाला 'आंबट'शौकीन; आणखी एक कारनामा उघड, वाचा...

अनिल कांबळे
Saturday, 4 January 2020

खंडणी, वसुली, मर्डर, अपहरण आणि मांडवली (मध्यस्थी) यासाठी डॉन परिचित होता. मात्र, त्याला आंबटशौक होता. त्याच्या बंगळुरू, गोवा, मुंबई, औरंगाबाद, ठाणे आणि नागपुरात गर्ल्सफ्रेंड्‌स होत्या. तसेच काही तरुणींचे त्याने पिस्तूलच्या धाकावर लैंगिक शोषण केले तर काही तरुणींना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवले होते.

नागपूर : गुन्हेगारी जगतात मोठी दहशत असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर हा आंबटशौकीन निघाला आहे. त्याच्यावर आतापर्यंत दोन मुलींनी बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत तर एका गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या मुंबईच्या गर्लफ्रेंडने पोलिस चौकशीदरम्यानच आंबेकरच्या थोबाडीत हाणली होती. सध्या डॉन आंबेकर एका 17 वर्षांच्या मुलीच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुन्हे जगतात कुख्यात गुंड आंबेकरचे प्रस्थ आहे. उपराजधानीत सराफा व्यापारी वर्गात आंबेकरची वेगळीच दशहत आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खंडणीच्या स्वरुपात सराफा व्यापाऱ्यांकडून उकळले आहेत. "प्रोटेक्‍शन मनी' नावाने आंबेकरने व्यापारी जगतात पैसे उकळण्याचा फंडा सुरू केला होता. यासोबत खाली भूखंडावर कब्जा करणे आणि बनावट कागदपत्र तयार करून विकण्याचा गोरखधंदा आंबेकरने सुरू केला होता. 

हेही वाचा - जिद्द असावी तर अशी... विजेचा दिवा अन्‌ 'ती'...

खंडणी, वसुली, मर्डर, अपहरण आणि मांडवली (मध्यस्थी) यासाठी डॉन परिचित होता. मात्र, त्याला आंबटशौक होता. त्याच्या बंगळुरू, गोवा, मुंबई, औरंगाबाद, ठाणे आणि नागपुरात गर्ल्सफ्रेंड्‌स होत्या. तसेच काही तरुणींचे त्याने पिस्तूलच्या धाकावर लैंगिक शोषण केले तर काही तरुणींना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच भाईगिरीच्या धंद्यात असलेल्या महिलांना तो अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी पैसा पुरवित होता.

Image result for santosh ambekar

आंबटशौकीन आंबेकरसाठी महिला दलाल अल्पवयीन मुलींना रग्गड रक्‍कम देऊन हॉटेलमध्ये पाठवित होत्या, अशी माहिती समोर आली आहे. नागपुरातील एका डॉक्‍टर तरुणीला केवळ 16 वर्षांची असताना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला पिस्तूलचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केला. त्या तरुणीला शैक्षणिक सुविधा पुरवून डॉक्‍टर बनल्यानंतर इतर कुणाही युवकासोबत लग्न करण्यास मनाई करण्यात आली होती, अशी चर्चा आहे. तरुणीला पोलिसांनी विश्‍वासात घेतल्यानंतर तिने डॉन आंबेकरविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. 

आंबेकर लक्ष्मीनगरात कॉपर नावाने असलेल्या सलूनमध्ये पार्टनर आहे. सलूनचा मालक विवेक सिंग याने 16 वर्षांच्या मुलीला आंबेकरच्या ऑफिसमध्ये नेले. तेथे डॉनने मुलीला मदत करण्याच्या नावाखाली पिस्तूल दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गुजरातच्या व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक केलेली आंबेकरची गर्लफ्रेंड मनीषा चौधरी हिच्या नावाने मुंबईत कोट्यवधीची संपत्ती केल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात तपास सुरू असताना लग्नाचे आमिष देऊन फसविल्यामुळे संतप्त झालेल्या मनीषाने डॉनच्या थोबाडीत मारून आपला राग शांत केला होता, अशी माहिती आहे.

अधिक वाचा - ...अन्‌ त्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोरच काढली फिनाइल बॉटल

बारबालांवर लाखोंची उधळण

डॉन आंबेकरला डान्सबारमध्ये बसण्याचा शौक होता. त्यासाठी तो मुंबई आणि गोवामध्ये जात होता. रात्रभर तो बार डान्सरवर लाखोंची उधळण करीत होता. बारमध्ये डॉन आल्याची माहिती मिळताच बारमालकही बारगर्ल्स संख्या वाढवून रात्रभरात लाखोंची कमाई करीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Image result for santosh ambekar

जुगार अड्डा संचालकांकडून 'हप्ता'

शहरात गुन्हे शाखेतील काही पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील काही पोलिसांना "सेट' केल्यानंतर जुगार भरविला जातो. सेटिंगमध्ये लाखोंची रक्‍कम पोलिसांकडे जात असल्याची चर्चा आहे. मात्र, डॉन आंबेकर हा प्रत्येक जुगार अड्डा संचालकाकडून "प्रोटेक्‍शन मनी'च्या नावावर लाखोंचा हप्ता वसूल करीत होता. त्याला पैसे देण्यास नकार देण्याची कुण्याही जुगार अड्डा संचालकाची हिंमत नव्हती. त्यामुळे वाममार्गाने कमविलेला पैसा आंबेकर अय्याशीवर उडवित होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another case of don ambekar revealed