भंडारा, गोंदिया जि.प.सह 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

file photo
file photo

नागपूर : कोरोनामुळे राज्यातील हजारो ग्राम पंचायतींच्या निवडणुका रखडल्याने संबंधित ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला केली आहे. 


कोरोनाच्या नियंत्रणाकरता करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. ग्राम पंचायतींच्या निवडणुकाही घेता आल्या नाहीत. राज्यातील 1566 ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आला.

यात सर्वाधिक 524 ग्राम पंचायती अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्या पाठोपाठ यवतमाळमधील 461,गडचिरोली जिल्ह्यातील 290, नाशिकमधील 102 ग्राम पंचायतील आहेत. नागपूर जिल्ह्यातील एका ग्राम पंचायतीचा समोवश आहे. कोरोनामुळे ग्राम पंचायतींची निवडणूक घेता येणार नाही आहे. शाळा सुरू होणार आहे. शाळा, गाव कोरोनामुक्त ठेवण्याकरता आवश्‍यक उपाययोजना करण्याची जबाबदारी सरपंचांवर टाकण्यात येणार आहे.

परंतु गावातील प्रमुख म्हणजे सरपंचच नसल्याने मोठी अडचण होण्याची शक्‍यता आहे. कार्यकाळ संपल्याने व निवडणुका होणार नसल्याने ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भातली तरतूद ग्राम पंचायत कायद्यात केली. अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी 25 जूनला तसा अध्यादेशही काढला. यानुसार प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.

योग्य व्यक्तीची व्याख्या कायद्यात स्पष्ट करण्यात आली नाही. पूर्वी निवडणूक न झाल्यास विस्तार अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येत होती. योग्य व्यक्ती म्हणून सरकारच्या मर्जीतील व्यक्तीची निवड होणार असल्याचे बोलल्या जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यकाळ संपुष्टात आलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेवर प्रशासक 
भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांची मुदत 14 जुलैरोजी संपत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतर्गत 15 पंचायत समित्यांची मुदत 11 जुलैला संपत आहे. या दोन्ही जिल्हा परिषदांसह 15 पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचे बोलल्या जात आहे. 
संपादन : नीलेश डोये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com