नागपुरातील या भागातील नागरिकांना दिलासा; हे परिसर केले सील

मंगळवार, 30 जून 2020

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील सोमलवाड्यातील जयप्रकाशनगरातील परिसर सील करण्यात आला. जयप्रकाशनगरातील पूर्वेस रस्ता, उत्तरेस रस्ता, पश्‍चिमेस रस्ता आणि दक्षिणेस रस्ता व हनुमान मंदिर परिसर सील करण्यात आला. 

नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट, सोमलवाडा, खामला, दक्षिण अंबाझरी रोडवरील माधवनगरातील काही परिसर सील करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रातून वगळून न्यू नंदनवनमधील परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यात आला. 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज चार वेगवेगळ्या भागांतील क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले. यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील सोमलवाड्यातील जयप्रकाशनगरातील परिसर सील करण्यात आला. जयप्रकाशनगरातील पूर्वेस रस्ता, उत्तरेस रस्ता, पश्‍चिमेस रस्ता आणि दक्षिणेस रस्ता व हनुमान मंदिर परिसर सील करण्यात आला. 

प्रभाग 37 मधील खामला येथील टेलिकॉमनगराच्या पूर्वेस कला अपार्टमेंट ते निखारे यांचे घर, उत्तरेस निखारे यांचे घर ते व्यवहारे यांच्या घरापर्यंत, पश्‍चिमेस व्यवहारे यांचे घर ते म्हात्रे यांच्या घरापर्यंत तर दक्षिणेस म्हात्रे यांच्या घरापासून ते कला अपार्टमेंटपर्यंत निर्बंध लावण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 13 येथील माधवनगराच्या पूर्वेस दक्षिण अंबाझरी रोड, उत्तरेस प्रसाद हॉस्पिटल, उत्तर-पश्‍चिमेस वसंत वाकोर्डीकर यांचे घर, पश्‍चिमेस बी. सराफ यांचे घर, दक्षिणेस डॉ. पुष्पराज गडकरी यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... 

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 17 मधील मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट्‌सच्या उत्तरेस एनएनडीएल संरक्षक भिंत, टाटा कॅपिटल हाईटची संरक्षक भिंत, दक्षिण-पूर्वेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, दक्षिण-पश्‍चिमेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, पश्‍चिमेस रामबाग गल्ली, उत्तरे-पश्‍चिमेस एनएनडीएल कार्यालयाची संरक्षक भिंतपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. नेहरूनगर झोनमधील प्रभाग 27 मधील न्यू नंदनवन हा परिसर कोरोनामुक्त झाल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आला आहे.