उद्धवा अजब तुझे सरकार! विजबिलांच्या वसुलीसाठी ग्राहकांना ‘अल्टीमेटम’; शासकीय कार्यालयांचे काय?

Arrears of crores to government offices
Arrears of crores to government offices

नागपूर : सामान्य ग्राहकांकडून वीज देयकाच्या वसुलीवर महावितरणकडून भर देण्यात येत आहे. त्याचवेळी शासकीय कार्यालयांकडे थकीत असलेली वीजबिलांची रक्कमही कोटीच्या घरात असल्याचे समोर आले आहे. थकबाकीच्या वाढत्या आकडेवारीमुळे महावितरणचा आर्थिक ताळेबंदच चुकला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली. परिणामी अनेक ग्राहक वीजबिल भरू शकले नाहीत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ग्राहकांनी तीन महिन्यांचे एकत्रित बिल पाठविण्यात आले. वारेमाप बिलामुळे ग्राहकांच्या संताचा भडका उजाला.

त्यातच ग्राहकांना दिलासा देण्यासंदर्भातील संकेत सरकारकडून मिळाले. परिणामी ग्राहकांनी बिल भरण्याकडेच पाठ फिरविली. बिलाची वसुली खोळंबल्याने महावितरण संकटात सापडले आहे.

महावितरणच्या केवळ शहर परिमंडळाचा विचार केल्यास तीन लाख ७३ हजार ४८ वीजग्राहकांकडे ३५७.२३ कोटींची थकबाकी आहे. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच कोरोनाचे संकट शासकीय विभागांवरही कोसळले. निधीची तरतूदच होऊ न शकल्याने शासकीय विभागांनीही बिलाचा भरणा केला नाही.

काँग्रेसनगर विभागांतर्गत येणारी शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये अशी एकूण ६११ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ८६.५७ लाखांची थकबाकी आहे. सिव्हिल लाइन्स विभागीतही २८९ ग्राहकांकडे ७१.३० लाखांची थकबाकी आहे. ऐवढेच नाहीतर शहर परिमंडळांतर्गत असणाऱ्या पथदिव्यांच्या २६४६ जोडण्यांवर १७.५० कोटींची तर पाणीपुरवठ्यासाठी असणाऱ्या ६५१ जोडण्यांवर २.८२ कोटी थकीत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com