Union Budget 2020 : रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूक

मंगेश गोमासे, संकलन
Saturday, 25 January 2020

सरकारने जोड उद्योगांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यातूनही बऱ्याच प्रमाणात रोजगार निर्मिती शक्‍य होते. मात्र, गेल्या काही वर्षांत अनौपचारिक क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे रोजगारनिर्मितीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे या क्षेत्राकडे विशेषत्वाने लक्ष घालून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. 

बेरोजगारी देशासमोरील मुख्य मुद्दा आहे. त्यावर मात करण्यासाठी अद्याप केंद्र सरकारकडून कुठले ठोस पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येत नाही. नोटबंदीने देशातील अनौपचारिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाताहत केली. या क्षेत्रातून मिळणारा रोजगार बंद झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून या क्षेत्राला "बूस्ट अप' करण्याची गरज आहे. एक फेब्रुवारी 2020 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार याकडे लक्ष घालेल का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

बेरोजगारी सध्या देशासमोर सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. गेल्या काही वर्षात गुंतवणूक क्षेत्रात झालेली घट आणि नोटबंदी यामुळे अनौपचारिक गुंतवणूक क्षेत्राला मोठा फटका बसल्याने ही समस्या आणखीच बिकट झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून रोजगाराची निर्मिती करण्यासाठी स्थानिक पातळीवर उद्योगाची निर्मिती होऊन त्यात गुंतवणूक कशी वाढेल यावर प्रादेशिक स्तरावर प्रश्‍नांची जाण असणे गरजेचे आहे. 

Union Budget 2020 : ग्रामीण अर्थव्यस्थेला हवा बूस्ट

देशात लघु, मध्यम आणि मोठ्या स्तरावर उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगाचा विकास करण्याच्या उद्देशाने धोरण आखणे गरजेचे आहे. या उद्योगांना गुंतवणुकीवर मिळणारी सवलत अतिशय महत्त्वाची ठरते. या सवलतीनुसार गुंतवणुकीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ती वाढविल्यावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळते. शिवाय उद्योजकांना प्रेरणा मिळते. 

संबंधित इमेज

सरकारने जोड उद्योगांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यातूनही बऱ्याच प्रमाणात रोजगार निर्मिती शक्‍य होते. मात्र, गेल्या काही वर्षांत अनौपचारिक क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे रोजगारनिर्मितीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे या क्षेत्राकडे विशेषत्वाने लक्ष घालून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. 

कनेक्‍टीव्हीटी वाढल्यास शेतकऱ्यांना फायदा 
रोजगार निर्मिती ही सध्या देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी अनौपचारिक क्षेत्राकडे सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे. अनौपचारिक क्षेत्रात सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होत असल्याने त्यातून बेरोजगारांना काम मिळेल. यासाठी या क्षेत्रात अधिकाअधिक गुंतवणूक व्हावी. येत्या अर्थसंकल्पात त्याबद्दल विचार व्हायला हवा. शिवाय कृषी क्षेत्रातील जोड उद्योगांचा विकास झाल्यास ग्रामीण भागातील बेरोजगारीचा प्रश्‍न मिटविता येणे शक्‍य होईल. रस्त्यांची कनेक्‍टीव्हीटी अधिक असणेही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरात आपल्या मालाची विक्री करण्यास मदत होते. ती कनेक्‍टीव्हीटी वाढल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. 
- डॉ. विनायक देशपांडे,
अर्थतज्ज्ञ

Union Budget 2020 : लोक विचारताहेत, कोणत्या कंपनीचा विमा काढावा?

अधिकाअधिक उद्योजकांना प्राध्यान्य मिळणे अपेक्षित 
नोटबंदीमुळे अनौपचारिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. छोट्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी अनौपचारिक क्षेत्रातील उद्योगांना स्थैर्य मिळेल या उद्देशाने तेथील गुंतवणूक वाढवावी लागणार आहे. कुठल्याही अर्थव्यवस्थेत तेथील एखाद्या उद्योजकाला महत्त्व देण्यापेक्षा अधिकाअधिक उद्योजकांना प्राध्यान्य मिळणे अपेक्षित असते. त्यामुळे या उद्योजकांना सरकारकडून आश्‍वासित करणे गरजेचे ठरणारे आहे. तीच भूमिका सरकारची असावी. त्यातून अधिकाअधिक गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. रोजगाराची निर्मिती होण्यासही मदत होईल. 
- डॉ. अनंत देशमुख, 
अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Job creation and investment