
यंदा महाराष्ट्राला ४ राष्ट्रपती पोलिस पदक आणि ५३ पोलिस पदके मिळाली आहेत. यात नागपुरातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद ऊर्फ शारदाप्रसाद मिश्रा यांचा समावेश आहे, तर नागपुरातील चंदादवेी सराफ शाळेत शिकणाऱ्या श्रीनभ अग्रवाल याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्य आणि पोलिस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी दरवर्षी राष्ट्रपतींतर्फे वेगवेगळे पदक देऊन गौरवण्यात येते. यंदा महाराष्ट्राला ४ राष्ट्रपती पोलिस पदक आणि ५३ पोलिस पदके मिळाली आहेत. यात नागपुरातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद ऊर्फ शारदाप्रसाद मिश्रा यांचा समावेश आहे, तर नागपुरातील चंदादवेी सराफ शाळेत शिकणाऱ्या श्रीनभ अग्रवाल याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
नागपूर पोलिस दलातील एकमेव कर्मचारी -
नागपूर शहर पोलिसदलात सलग ३२ वर्षे सेवा केलेले शारदाप्रसाद मिश्रा यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाले. ते सध्या अंबाझरी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. मिश्रा यांना आतापर्यंत २९० पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी त्यांना २०१८ मध्ये पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आतापर्यंत कोराडी, तहसील, एमआयडीसी, सीताबर्डी आणि धंतोली पोलिस ठाण्यात उत्कृष्ट काम केले आहे. 'आज माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. पोलिस दलात इमानेइतबारे काम केल्याचा हा सन्मान आहे, असे मी मानतो, अशी प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली.
हेही वाचा - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
श्रीनभ अग्रवाल याला राष्ट्रीय बाल पुरस्कार -
चंदादेवी सराफ शाळेत शिकणाऱ्या श्रीनभ अग्रवालने आपल्या नावीन्यपूर्ण युक्तीच्या आणि कृषी तंत्राच्या सहाय्याने हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला. भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील ३२ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये येथील श्रीनभ अग्रवाल याचा समावेश आहे. त्याचे आतापर्यंत २०० पेक्षा अधिक वैज्ञानिक लेख, दोन पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.