दाद मागायची कोणाला? पोलिसच असुरक्षित, वाचा काय झाले...

attacked in Police personnel at Nagpur
attacked in Police personnel at Nagpur

नागपूर : शिवीगाळ करताना हटकल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्‍याने पोलिसांवरच दगडफेक करण्यासह लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. या घटनेत पोलिस शिपाई जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री मेकोसाबाग पुलाजवळ घडली. घटनेत सहा गुंडांचा समावेश होता, त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

रोहित सुनील उईके (25), विजय अनिल टेकाम (21), प्रणय ऊर्फ गोलू अशोक उईके (19), रितिक गणेश टेकाम (19) संजय ऊर्फ अजय उईके (22) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. घटनेत हिमांशू अशोक सिडाम (20) याचाही समावेश होता. सर्व आरोपी दुर्गामाता मंदिरजवळ, खदान, गोंडवाना चौक येथील रहिवासी आहेत.

शांतीनगर ठाण्याचे पोलिस शिपाई सागर थाटे आणि नायक पोलिस शिपाई विनोद समजोरे हे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय कामानिमित्त मेकोसाबाग पुलाजवळील गोंडवाना चौकातून जात होते. त्याचवेळी आरोपी जोरजोरात शिवीगाळ करीत होते. सागर थाटे यांनी आरोपींना हटकले.

संतापलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत पोलिसांच्या दिशेनेच दगडफेक करायला सुरुवात केली. एक दगड डोक्‍याच्या मागच्या भागात लागून थाटे यांना दुखापत झाली. यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करीत धमकावले. याप्रकरणी थाटे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची धडपकड सुरू केली. त्यानंतर एका पाठोपाठ पाच आरोपींना अटक करण्यात आली.

तरुणाची आत्महत्या

शिवाजीनगर, अग्निमाता मंदिर, मानापुरे गल्ली येथील रहिवासी सचिन मरसकोल्हे (20) याने गळफास लावून आत्महत्या केली. अंगातील शर्ट काढून शेजारीच राहणाऱ्या सुभाष मरसकोल्हे यांच्या घराच्या गच्चीवरील लोखंडी सळाखीला बांधून त्याने गळफास घेतला. शुक्रवारी रात्री 8.30 वाजता ही घटना उघडकीस आली. तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. गेल्याकाही दिवसांपासून तो दारूच्या आहारी गेला होता आणि सतत तणावात राहायचा. शुक्रवारी रात्री त्याने टोकाचे पाऊल उचलीत जीवन संपविले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com