अत्यावश्यक कामाशिवाय पालिकेत येणे टाळा; आयुक्तांनी का केले असे आवाहन... 

file photo
file photo

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृतांचा आकडाही सारखा फुगत आहे. कोरोना काही केल्या आटोक्यात येत नाहीय. त्यामुळे शहरात दहशत पसरली आहे. महापालिकेच्या विविध विभागांतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे... 

महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागांतील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभागाद्वारे नागरिकांना अत्यावश्यक सेवा दिला जातात. या सेवा काही प्रमाणात बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षेचे दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी येण्याचे टाळावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ‘नागपूर लाइव्ह सिटी’ मोबाईल ॲपवर नोंदवाव्या. 

या ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील असून, त्यासाठी नागरिकांना मनपामध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना कोविड-१९ संबंधी तक्रार असल्यास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ तसेच पाणीपुरवठा व चोकेजसंबंधी तक्रारी असल्यास ०७१२-२५६५५०९ वर संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी महापालिकेत येण्याऐवजी ‘नागपूर लाइव्ह सिटी’ मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवावी. महापालिकेत येण्याचे टाळून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com