लोकशाही मूल्य रुजविण्यासाठीच बुद्धिजमचा बाबासाहेबांकडून स्वीकार

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. प्रो. स्कॉट स्ट्राऊड.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. प्रो. स्कॉट स्ट्राऊड.

नागपूर : भारतात जातीय भेदभाव आणि बंधुभाव समस्याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. बुद्धिजम बंधुत्व तत्त्वज्ञानाच्या आधारावर आहे. ते लोकशाही मूल्य आणि जीवनाशीही संबंधित होते. त्यामुळे या कल्पना भारतात बंधुत्व रुजविल्यानंतर प्रस्थापित करता येईल, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी बुद्धिजम स्वीकारला, असे प्रतिपादन टेक्‍सास विद्यापीठातील डॉ. प्रो. स्कॉट स्ट्राऊड यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने सोमवारी (ता.13) दीक्षान्त सभागृहात बौद्ध शिकवणीवर आधारित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. प्रो. स्कॉट स्ट्राऊड "सोशल डेमोक्रॉसी, दि प्रॉब्लेम ऑफ फोर्स अँड आंबेडकर व्हीजन ऑफ बुद्धिजम' विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. नीरज खटी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रो. स्कॉट ट्राऊड म्हणाले, बौद्धवादाला आदर्शवादी स्वरूपाची अशी दीर्घ परंपरा आहे. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर बौद्ध धम्माच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला, असे प्रतिपादन त्यात सुधारणा घडवून आणल्या. त्या भारतीय परिस्थितीत राबविण्याचा प्रयत्न डॉ. आंबेडकरांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्या काळात कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले, त्याकाळी कोलंबिया विद्यापीठ नवनवे शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण होते. सर्वांत महत्त्वाचे आणि मोठे प्रोफेसर त्यावेळी होते. याच काळात त्यांनी जॉन डेव्हीचे ग्रंथ, संशोधन अभ्यासले. जॉन डेव्ही यांचे निधन झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठात डी.लिट पदवीसाठी जाण्याचा योग आला. त्यावेळी जॉन डेव्हीचा प्रभाव आपल्यावर आयुष्यभर राहिला, असे जॉन डेव्ही यांच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला.
 
याशिवाय डॉ. आंबेडकरांच्या लिखाणातही जॉन डेव्ही यांचा चांगलाच प्रभाव दिसून येतो. जॉन डेव्हीचे तत्त्वज्ञान आणि विचार डॉ. आंबेडकरांनी आपल्या देशात लागू करता येईल का, यावर चिंतन केले. संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून भारतात लागू केले, असेही डॉ. प्रो. स्कॉट स्ट्राऊड यांनी सांगितले. उद्या सायंकाळी चार वाजता व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com