मुलीच्या वयाच्या तरुणीवर जडले व्यापाऱ्याचे प्रेम; मग घडले हे नाट्य 

file photo
file photo

नागपूर : कोरोना काळात अन्नदान करताना ओळख झालेल्या तरुणीवर वयाने दीडपट असलेल्या व्यापाऱ्याचे प्रेम जडले. तिला प्रेमात ओढण्यासाठी व्यापाऱ्याने आकांततांडव केला. तिच्या घरात घुसून तिच्या आईवडिलांना मारहाण केली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वनराम दांगी (४५, रा. कोराडी) असे आरोपी प्रेमवीराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वनराम दांगी याचा कोराडीत अन्नधान्याचा व्यवसाय आहे. पीडित २९ वर्षीय तरुणी पूनम (बदललेले नाव) ही आपले आईवडील व लहान बहिणीसह मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहाते. टाळेबंदीच्या काळात ती एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मानकापूर विभागीय क्रीडासंकुल परिसरातील मोकाट कुत्र्यांना अन्न खाऊ घालायची. त्यावेळी आरोपीही तेथे अन्न वितरित करण्यासाठी येत होता. दोघांची ओळख झाली. ते वयाने मोठे असल्याने ती त्यांचा आदर करायची. 

संस्थेच्या कामानिमित्त ते नेहमी बोलायचे. काही दिवसांपूर्वी तो घरी आला. त्याची तिच्या वडिलांशीही मैत्री झाली. तो पूनमवर एकतर्फी प्रेम करायला लागला. पूनमचे प्रेम मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत होता. एक दिवस त्याने तिला मोबाईलवर मॅसेज पाठवला असता तिला त्याचा हेतू समजला. तिने त्याला आपल्या वडिलांच्या वयाचे असल्याचे समजावून सांगितले. त्यानंतर तो तिचा पाठलाग करू लागला. तिने त्याला प्रतिसाद न देता पोलिसांत तक्रार दिली. 

पोलिसांत तक्रार दिल्याने तो चिडला व रविवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरी दाखल झाला. तिच्या वडिलांसोबत चर्चा केली. तिच्या वडिलांनी त्याला पोलिस ठाण्यातच चर्चा करण्याची तयारी दर्शविली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com