हॅलोऽऽ हॅलोऽऽ... मी बॅंकेतून बोलतो... अन्‌... 

Beware of fake call messages
Beware of fake call messages

नागपूर : संचारबंदीमुळे ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. ऑनलाईन बॅंकिग करण्याची संख्याही वाढली आहे. यापाठोपाठ नवख्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करण्याच्या हेतूने फेक कॉल येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. नागपुरात एका महिलेची सहा लाखांनी ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. यावरून नव्याने, ऑनलाइन नेटबॅंकिंग वापर करीत असलेल्या महिला सायबर गुन्हेगारांच्या रडावर असल्याचे दिसून येते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लहान मोठ्या बाजारपेठा बंद आहेत. यामुळे गृहउद्योग किंवा ऑनलाइन व्यवसाय विस्तारत आहेत. गृह उद्योगामार्फत बचतगटातून उत्पादने तयार करून विकण्यास महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी लागणारे ऑनलाइन व्यवहार, नेट बॅंकिंग, युपीआय याचा नव्याने वापर करणाऱ्यांत सर्वसामान्य, मध्यमर्गीय महिलांची संख्या वाढत आहे. अशा नवख्या ग्राहकांना हेरून हॅकर्सकडून फेक कॉल करीत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

लॉकडाउनमुळे बॅंकेत न जाता ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यालाही प्राधान्य दिले जात आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करून देणाऱ्या असंख्य कंपन्या आर्थिक व्यवहारावर कॅश बॅक ऑफर देत आहेत. परिणामी अशा व्यवहारांकडे कल वाढू लागला आहे. परंतु, फायदे तितकेच तोटे याचा प्रत्यय याही बाबतीत येऊ लागला आहे. 

अनोळखी क्रमांकावरून मिसकॉल येणे, 6 किंवा 8 अंकी आयएसडी कॉल, इंटरनेट कॉल, अनोळखी क्रमांकावरून कॉले येणे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. अशा फोन कॉलला प्रतिसाद देताच संबंधित ग्राहकाच्या बॅंक खात्याची माहिती जाणून घेऊन खात्यावरील रकमेवर ठल्ला मारला जातो.

एखादा ऑनलाइन आर्थिक व्यवहार झाल्यास पुढच्या काही क्षणातच अनोळखी क्रमांक अथवा 6-8 अंकी क्रमांकावरून कॉल येण्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळेच सिम कार्ड कंपन्या व विविध बॅंका अशा कोणत्याही कॉल व मिस कॉलला प्रतिसाद न देण्याची सूचना एसएमएसद्वारे करू लागली आहेत. आपल्या बॅंक खात्याशी संबंधित माहिती आमच्याकडून विचारली जात नसल्याचे वारंवार सुचित केले जात आहे. 

अशी घ्या काळजी 

  • क्रमांकाची पडताळणी करून कॉल स्वीकारणे 
  • आंतरराष्ट्रीय कॉल तसेच अनोळखी नंबर रिजेक्‍ट लिस्टमध्ये टाकावे 
  • 6 किंवा 8 अंकी क्रमांकावरून येणारा कॉल हा इंटरनेट कॉल असू शकतो या कॉल्सला ट्रेस करणे देखील अवघड असते. यामुळे असे कॉल आल्यास सतर्कता बाळगावी. 
  • ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी माणसाला यूपीआय पीन, सीसीव्ही तसेच बॅंकेशी संबंधित माहिती देऊ नका 

महाराष्ट्र सायबरतर्फे नागरिकांना आवाहन

140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन रिसीव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाऊंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही. जोपर्यंत आपण बॅंक अकाउंट, डिटेल्स ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सीव्हीही पीन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बॅंक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात आले आहे. 

आमिषाला बळी पडू नका 
ऑनलाइन खरेदी करताना संबंधित साईडवर आपला मोबाईल नंबर रजिस्टर असतो. त्यामुळे हॅकर्स आणि सायबर क्रिमीन्‌ल्स याचा गैरफायदा घेतात. हॅकर्स वारंवार एसएमएस आणि कॉल करून ओटीपी मागतात. बक्षीस लागले आहे असे सांगतात. परंतु, अशा कुठल्याही कॉल किंवा मॅसेजच्या आमिषाला बळी पडू नये. 
- अश्‍विनी जगताप, 
सायबर क्राईम, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com