कोरोना संकटातही पक्षीप्रेमींचे पक्ष्यांसाठी दाणापाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

घरातील तुटक्या फुटक्या प्लास्टिकच्या बॉटल, मातीचे खापर यांचा उपयोग करून त्यांनी घरीच पक्ष्यांसाठी जलपात्र आणि धान्यपात्र तयार केले आहेत. परिसरातील ज्या वृक्षांवर पक्षांचा चिवचिवाट अधिक असतो अशा वृक्षांच्या फाद्यांना हे पात्र बांधण्यात आले आहेत. एका वृक्षाला तीन पात्र बांधण्यात आले आहेत.

नागपूर  : शहरात सूर्यनारायणाचा प्रकोप तीव्र होत असून, कडक तापलेल्या उन्हामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. याला पक्षी अपवाद नाहीत. पक्षांना पिण्याचे पाणी मिळावे आणि त्यांना अन्नधान्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून सहकारनगरातील पक्षीप्रमी सरसावले आहेत.
उन्हाळा सुरू झाला की पशूपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. याचा विचार करून सुरेश चव्हारे, धीरज मते, कमलेश मनोटे व लहानगी होनिशा चोखरे मित्र परिवाराने परिसरातील पशूपक्षांचे उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी वृक्षांवरच पाण्याची सोय केली आहे. याकरिता परिसरातील लहानगे देखील मदत करीत आहेत. घरातील तुटक्या फुटक्या प्लास्टिकच्या बॉटल, मातीचे खापर यांचा उपयोग करून त्यांनी घरीच पक्ष्यांसाठी जलपात्र आणि धान्यपात्र तयार केले आहेत. परिसरातील ज्या वृक्षांवर पक्षांचा चिवचिवाट अधिक असतो अशा वृक्षांच्या फाद्यांना हे पात्र बांधण्यात आले आहेत. एका वृक्षाला तीन पात्र बांधण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा - वस्त्रनिर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला
उन्हाळ्याच्या काळात मनुष्याला तहान अधिक लागते, त्याच प्रमाणे पक्ष्यांनाही पाण्याची आवश्यकता असते. उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे पक्षी वृक्षांच्या सावलीत राहतात. तहानलेल्याला पाणी पाजण्या इतके पुण्य नाही. त्यामुळे नागरिकांना आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पक्षांसाठी पाण्याची सोय करावी असे आवाहन या पक्षी प्रेमींनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird lovers continue to care for birds even in corona crisis

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: